Ganesh Visarjan 2024 : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषात मंगळवारी लाडक्या बाप्पााला निरोप दिला. मुंबई, पुण्यासह राज्यभरात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुका काढत ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला. पण बुलढाणा आणि भिवंडीमध्ये गणरायाला निरोप देताना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव शांततेत पार पडत असताना भिवंडी आणि बुलढाणा येथे तणावाचे वातावरण होते.
मंगळवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक गणेशभक्त जखमी झाले. त्यानंतर जळगाव जामोद शहरातील पंधरा गणेश मंडळांनी दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली होती. जळगाव जामोद शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. एसआरपीची तुकडीही तैणात करण्यात आली होती.
संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव शांततेत पार पडत असताना मंगळवारी विसर्जन दुपारी तीन वाजता पासून भिवंडी शहरात शांततेत सुरू झाली होती. त्यानंतर रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास वंजार पट्टी नाका परिसरात श्री हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याच्या घटना घडली. या घटनेनंतर या संपूर्ण परिसरात मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण झाला. गणेश भक्ताने रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांना जमावा कडून मारहाण झाल्याची घटना घडली.
यामुळे तणाव अजून वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलिस सुध्दा जखमी झाला आहे. या घटने नंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.