Pandharpur Vidhan Sabha : पंढरपुरात भाजप विरूद्ध मविआमध्ये रंगणार सामना; आमदार आवताडे यांना कडवे आव्हान, भाजपचे माजी आमदारही तयारीत

Pandharpur News : मागील अकरा वर्षे (कै.) आमदार भारत भालके यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या २०२१ च्या पोटनिवडणुकीत प्रथमच समाधान आवताडे यांच्या रूपाने भाजपला यश मिळाले
Pandharpur Vidhan Sabha
Pandharpur Vidhan SabhaSaam tv
Published On

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत प्रथमच भाजपला विजय मिळविता आला आहे. मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना पाहण्यास मिळणार असून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना कडवे आव्हान राहणार असल्याचे चित्र आहे. 

Pandharpur Vidhan Sabha
Nanded Flood : नांदेडमध्ये पुरस्थिती कायम; गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, आतापर्यंत २०० कुटुंबांचे स्थलांतर

पंढरपूर मतदार संघावर अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. मागील अकरा वर्षे (कै.) आमदार भारत भालके यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या २०२१ च्या पोटनिवडणुकीत प्रथमच समाधान आवताडे यांच्या रूपाने भाजपला यश मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी या मतदार संघात एमआयडीसी, उपसा सिंचन योजनेसह अनेक विकास कामे केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विरोधक मात्र त्यांच्या या कामावर समाधानी नाही. आजही पंढरपूर मतदार संघामध्ये रस्ते, वीज, पाणी यासारखे अनेक मूलभूत प्रश्न जैसे थे असल्याचे सांगत आहेत. पंढरपूर- मंगळवेढा या मतदार संघांमध्ये नेहमीच मराठा समाजाचे वर्चस्व राहिले आहे. सर्वसामान्य मतदारांमध्ये सत्ताधारी भाजपा विषयी काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे. तर विरोधी महाविकास आघाडी विषय देखील मतदारांमध्ये आजूनही संभ्रमावस्था आहे. 

Pandharpur Vidhan Sabha
Parbhani Heavy Rain : ५० महसूल मंडळात अतिवृष्टी; परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; ठाकरे गटाची मागणी

भाजपचे माजी आमदारही तयारीत 

भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही गावोगावी जाऊन बैठका दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान प्रशांत परिचारक यांनी तुतारी हाती घ्यावी; अशी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे. परंतु परिचारक हे तुतारी हाती घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. तरीही खरी लढत परिचारक विरुद्ध अवताडे यांच्यात रंगणार आहे.

सध्या विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. तर भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील निवडणूक लढवणार आहेत. मात्र त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल की नाही? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपची उमेदवारी मिळाली नाही, तरी देखील ते निवडणूक लढवणार आहेत हे देखील तितकेच खरे आहे. सध्या महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, मंगळवेढ्याचे राहुल शहा, भगीरथ भालके आदी इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडे आदित्य फत्तेपूरकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com