Pune 5 Manache Ganpati : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींना भाविकांकडून निरोप; कोणत्या गणरायाचं कधी झालं विसर्जन? पाहा व्हिडिओ

Pune Ganeshotsav update: पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींना भाविकांकडून निरोप देण्यात आला आहे. या पाचही मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली होती.
Pune Ganesh Visarjan
Pune Manache Ganpati Visarjan Miravanuk TimeSaam Tv
Published On

पुणे : पुण्यातील सर्व भागात गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींना भाविकांनी जड अंतःकरणाने निरोप दिला आहे. मानाच्या गणपतीसाठी काढण्यात आलेल्या विर्सजन मिरवणुकीत हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. गणरायाचा जयजयकार करत भाविकांनी मानाच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं.

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात पुणेकर थिरकले. या मिरवणुकीत अनेकांनी पारंपारिक वेशात हजेरी लावल्याचं दिसून आलं. या मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अलका टॉकीज चौकात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. डेक्कन येथील नदी पात्रालगत पर्यावरण पूरक पद्धतीने या वर्षी गणपतीचं विसर्जन संपन्न झालं.

Pune Ganesh Visarjan
Mumbai Ganesh Visarjan: गणेशभक्तांनो लक्ष असू द्या! रात्री ११ वाजता येणार समुद्राला भरती, बाप्पाचे विसर्जन करताना घ्या काळजी

पारंपारिक पद्धतीने मानाच्या पाचही गणपतींना गणेशभक्तांनी जड अंतःकरणाने निरोप दिल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात मानाचे गणपती विसर्जित करण्यात आले. यावेळी मानाच्या पाचही गणपतींचं दर्शन घेण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला होता. यावेळी बाप्पाचे विलोभनीय रूप टिपण्यासाठी सगळ्यांच्या हातात मोबाईल फोन दिसले.

कोणत्या गणपतीचं कधी झालं विसर्जन?

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती: ४ वाजून ३५ मिनिटे

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी: ५ वाजून १० मिनिटे

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम: ६ वाजून ४४ मिनिटे

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ : ७ वाजून १५ मिनिटे

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती : ७ वाजून ३७ मिनिटे

Pune Ganesh Visarjan
Ganesh Festival : गणेशोत्सवात उंदीर मामा दिसला तर, 'हे' असतील शुभ-अशुभ संकेत

दगडूशेठ हलवाई गणपतीची झलक पाहण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

दरम्यान, आज दगडूशेठ हलवाई गणपती श्री उमांगमलज रथात विराजमान आहेत. तब्बल १ लाखांपेक्षा अधिक दिव्यांनी हा रथ सजवलेला आहे. रथावर जटा सोडलेला महादेवाची मूर्ती आहे. तसेच बाजूला २ भव्य त्रिशूळ उभारले आहेत. या रथावर २१ कळस तसेच आणि ८ स्थंभ उभारण्यात आले आहेत. विद्युत रोषणाईने सजलेला रथ पाहण्यासाठी अख्खा अलका टॉकीज चौक भरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com