दहावी -बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
दहावी- बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत घेतल्या जाणार
बारावी लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ ते १६ मार्च २०२७ दरम्यान होणार
दहावी लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ ते ११ मार्च २०२७ दरम्यान होणार
दहावी आणि बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०वी (SSC) आणि १२वी (HSC) परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला लागावे. ८ फेब्रुवारी २०२७ ते १६ मार्च २०२७ या कालावधीमध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या संभाव्य तारखा बोर्डाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि लेखी परीक्षांचे विषयानिहाय सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच बारावीच्या लेखी परीक्षा सोमवारी ८ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होतील आणि मंगळवारी १६ मार्च २०२७ रोजी संपतील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार २० जानेवारी २०२७ ते शनिवारी ६ फेब्रुवारी २०२७ या दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) म्हणजेच दहावीच्या लेखी परीक्षा सोमवारी १५ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होतील आणि गुरूवारी ११ मार्च २०२७ रोजी संपतील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरूवार २८ जानेवारी २०२७ ते शनिवारी १३ फेब्रुवारी २०२७ या दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.