देशभरात पेपरफूटीचे सत्र सुरूच राज्यात MPSC चा देखील पेपर फुटल्याने तरुणाई आता पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. याच सगळ्याचा जोरदार निषेध आणि विविध मागण्या घेऊन राज्यातील परीक्षार्थी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात जमा झालीय.
पुण्यात आज MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुरू आहे. सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून या मोर्चेला सुरुवात झाली असून विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चाला शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे इतर आमदार सहभागी झाले आहेत. परीक्षा, भरती, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यासारखे अनेक विषय प्रलंबित असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून सरकारने या मागण्या पूर्ण कराव्या म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनात अभूतपूर्व गर्दी झाली असून नजर जाईल तिथ पर्यंत तरुण रस्त्यावर उतरले आहे.
MPSC अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेऊन तिथे तत्काळ स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमावेत
गट-ब परीक्षेतील आक्षेपांवर ८ दिवसांत स्पष्टीकरण देऊन गैरप्रकाराची चौकशी करावी
राज्यसेवा मुख्य २०२५ आणि कृषिसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी व्हावी
मुंबई क्राईम ब्रँचने MPSC ला दिलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा
अटक आरोपी अवर सचिव अभिजीत लेंडवेच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे
आरोपी लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या सेवाकाळाची व पदोन्नती निकषांची सखोल चौकशी व्हावी
तिन्ही आरोपींच्या संपर्कातून निवड झालेल्या उमेदवारांचे सीडीआर (CDR) तपासावेत
प्रविण पाटील व मयुर ठाकरे व्यतिरिक्त इतर एजंट्सच्या सहभागाची सखोल चौकशी व्हावी
इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी
'DI' मधील संशयास्पद निकालांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे
२५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घ्यावी
लघुलेखक (Stenographer) पद पुनर्जीवित करण्यात यावे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.