Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Latur Crime: लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. डोक्यात गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे लातूर हादरले.
Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले
Latur CrimeSaam tv
Published On
  1. लातूर शिक्षण संस्थाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

  2. संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली

  3. लातूर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली

  4. जळगावमध्ये आईची ५ वर्षांच्या मुलासह आत्महत्या

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. लातूर शहरातील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. डोक्यात गोळी झाडून त्यांनी स्वत:ला संपवलं. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. शिक्षण संस्थाचालकाने टोकाचे पाऊल का उचलले या मागचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय या नामांकित शिक्षण संस्थेचे संचालक संजीव सोनवणे यांनी आत्महत्या केली. राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं. गोळीच्या आवाजाने परिसर हादरून गेला. या घटनेमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संजीव सोनवणे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट देखील सापडली नाही. ते कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेत आहेत.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले
Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

जळगावमध्ये आईची मुलासह आत्महत्या-

देशभरात गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरू असतानाच जळगाव शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ५ वर्षीय चिमुकल्यासह आईने गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुने जळगावच्या पुढे असलेल्या तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौकाजवळ महाजन कुटुंबीय राहतात. निखील महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून त्यांची सध्या नेमणूक राजस्थान येथे आहे.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

घराच्या तळमजल्यावर निखील महाजन हे तर भाऊ अक्षय महाजन हे पहिल्या माळ्यावर राहतात. रात्री हेमांगिनी निखील महाजन (वय २८ वर्षे) या मुलगा शौर्य (वय ५ वर्षे) याच्यासह घरात होत्या. तर उर्वरीत कुटुंबीय वरील माळ्यावर होते. सायंकाळी निखील यांच्या आई खाली आल्या असता कुणीही दरवाजा उघडत नाही. त्यांना शंका आल्याने त्यांनी इतरांना कळवल्यावर घडलेला प्रकार लक्षात आला. घटनास्थळी शनिपेठ पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. महाजन कुटुंबीय संपूर्ण परिसरात परिचित आणि सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले
Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com