Jalgaon: एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; जळगाव हादरले

Jalgaon Shocking News: जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली. त्यांना धावत्या लोकलसमोर उडी मारत आयुष्य संपवलं.
Jalgaon: एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; जळगाव हादरले
Jalgaon Shocking newsSaam Tv
Published On
  • जळगाव अमळनेरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

  • धावत्या ट्रेनसमोर उडी मारून कुटुंबातील चौघांनी आयुष्य संपवलं

  • या घटनेत आई-वडीलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू

  • टकरेखेडा येथे घडली ही घटना

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आई-वडीलांनी दोन मुलांना घेऊन धावत्या ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे जळगाव हादरले. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. पोलिस सध्या या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथे आज पहाटे ही घटना घडली. सुनील अमृत भिल आणि त्यांची बायको पार्वती सुनील भिल यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह रेल्वेसमोर उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालल्या नवरा-बायकोसह दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमळनेर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Jalgaon: एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; जळगाव हादरले
Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध मॉडेलवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं, जिम ट्रेनर घरातला घुसला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com