Wrestler News : भारताच्या राष्ट्रीय खेळाडूला पोलिसांकडून अटक, क्रीडा क्षेत्रात खळबळ

Ranchi Drug Case National Wrestler Arrested : रांचीतील ड्रग्ज प्रकरणात तीन वर्षांपासून फरार असलेल्या माजी राष्ट्रीय कुस्तीपटू अमितला दिल्लीतील रोहिणीतून अटक करण्यात आली. अमितविरोधातील NDPS प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Former Wrestler Amit Arrested In Ranchi Drug Case
Former Wrestler Amit Arrested In Ranchi Drug CaseAI Image
Published On
Summary
  • माजी राष्ट्रीय कुस्तीपटू अमितला रांचीतील कथित ड्रग्ज प्रकरणात अटक

  • अमित जवळपास तीन वर्षांपासून होता फरार

  • दिल्ली पोलिसांनी सापळा रचून अमितला घेतलं ताब्यात

  • क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी

क्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा राष्ट्रीय स्तरावरील माजी कुस्तीपटू अमितला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रांचीमधील ड्रग प्रकरणानंतर सुमारे तीन वर्षांपासून अमित फरार होता. पोलिसांनी सापळा रचून अमितला ताब्यात घेतले आहे. या घटनेने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित हा हरियाणातील रोहतकचा रहिवासी आहे. अमितने कुस्तीच्या मैदानावर उल्लेखनीय प्रवास केला. अमितने २०१३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. मात्र, त्यानंतर त्याचे नाव कथित ड्रग नेटवर्कशी संबंधित प्रकरणात समोर आल्याने तो पोलिसांच्या रडारवर आला होता. एप्रिल २०२३ मध्ये रांचीतील धुर्वा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती.

Former Wrestler Amit Arrested In Ranchi Drug Case
Heart Care : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान सुमारे ५०० ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले. या प्रकरणात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पुढे जात असताना अमितचा या प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित जवळपास ३ वर्षे पोलिसांना चकवा देत होता. तो दिल्लीमध्ये लपून असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर रांची पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.

Former Wrestler Amit Arrested In Ranchi Drug Case
Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! १ तोळा सोने इतक्या रुपयांनी महागले; वाचा आजचे ताजे दर

पोलिसांच्या पथकाने १८ ऑगस्ट रोजी दिल्लीतील रोहिणी परिसरात, मधुबन चौकाजवळ कारवाई करत अमितला अटक केली. त्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ट्रांझिट रिमांड मंजूर केल्यानंतर रांची पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, अमितविरोधातील प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या कथित ड्रग नेटवर्कमध्ये त्याची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेल्या एका कुस्तीपटूचे नाव अमली पदार्थांच्या प्रकरणात समोर आल्याने या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com