Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Latur Youth End life: लातूरमध्ये तरुणाने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. धारदार शस्त्राने गळा चिरून त्याने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला
Published On
  • तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली

  • गळ्यावरून चाकू फिरवत स्वत:ला संपवलं

  • लातूरच्या उदगीर तालुक्यातील माळेगाव येथील घटना

  • घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या तरुणाने राहत्या घरात गळ्यावरून चाकू फिरवत आयुष्य संपवलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ही घटना लातूरच्या उदगीरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. आत्महत्येमागचे कारण समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीर तालुक्यातील माळेगाव येथे ही धक्कादाय घटना घडली. अंबादास माधवराव घंटे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. या तरुणाने धारदार शस्त्राने स्वतःचा गळा चिरून घेत आत्महत्या केली. या घटनेत जास्त रक्तस्राव होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा खोलताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला.

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला
Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

तरुणाने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घरामध्ये सगळीकडे रक्त रक्त झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटने प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

दरम्यान अंबादास घंटे या तरुणाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र मयत अंबादास घंटे यांचे मागच्या काही वर्षांपासून मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती नातेवाईकांनी दिलीय. याच मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे देखील नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या धक्कादायक घटनेचा तपास पोलिस खोलवर जाऊन करत आहेत.

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला
Crime : भयानक! १९ वर्षांच्या पत्नीला हेल्मेटनं ठेचून मारलं, लग्नानंतर ४ महिन्यात नेमकं काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com