Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

Crime News: छत्तीसगडमधील भिलाई येथे OYO हॉटेलमध्ये १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गर्लफ्रेंडला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
19 year old boy end his life in oyo hotel due to fight with his 23 year old girlfriend
19 year old boy end his life in oyo hotel due to fight with his 23 year old girlfriendSaam Tv
Published On

Crime News: छत्तीसगडमधील भिलाई येथे एका OYO हॉटेलमध्ये १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी त्याची २३ वर्षीय गर्लफ्रेंड खोलीत उपस्थित होती. प्राथमिक माहितीनुसार, रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मृत तरुणाची ओळख शादाब शेख अशी झाली असून तो भिलाई परिसरातील रहिवासी होता. तो डीजे म्हणून काम करत होता. बुधवारी सायंकाळी तो आपल्या गर्लफ्रेंड सोबत कोहका परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये आला होता. दोघांनी रात्री हॉटेलमध्ये मुक्काम केला.

19 year old boy end his life in oyo hotel due to fight with his 23 year old girlfriend
Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री शादाबला त्याच्या एक्स गर्लफ्रेंड चा फोन आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याचदरम्यान तरुणीने स्वतःच्या मनगटाची नस कापण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. याच काळात शादाबने खोलीतील ओढणीचा वापर करून गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

19 year old boy end his life in oyo hotel due to fight with his 23 year old girlfriend
Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीला शुद्ध आल्यानंतर शादाब गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने त्याला खाली उतरवून ओळखीच्या व्यक्तींना फोन करुन घटनास्थळी बोलावले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच स्मृती नगर पोलीस आणि न्यायवैद्यक (एफएसएल) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हॉटेलमधील खोलीची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले. तसेच, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात तरुणीस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, तिचा जबाब नोंदवला जात आहे. वादाचे नेमके कारण, त्या रात्री घडलेल्या घटनाक्रमाची साखळी आणि आत्महत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com