Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

Beed Majalgaon Youth Brutally Beaten Over Bike Cut Viral Video: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात सावरगाव परिसरात मोटरसायकलचा उपसरपंचाच्या गाडीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाला घेरून अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे.

योगेश काशीद, साम टीव्ही

भय इथलं संपत नाही... बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात तरुणाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सावरगाव परिसरात उपसरपंचाच्या गाडीला मोटरसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून एका तरुणाला घोळका करून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिवरा गावातील दोन तरुण माजलगाव येथे टायपिंगचा क्लास करून मोटरसायकलवरून आपल्या गावाकडे परतत होते. यावेळी सावरगाव परिसरात त्यांच्या मोटरसायकलचा उपसरपंचाच्या गाडीला कट लागला. याच कारणावरून वाद निर्माण झाला. यानंतर एका तरुणाला काही जणांनी घेरून त्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com