Devendra Fadnavis Net Worth Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली; घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, एसआयडीचा गोपनीय रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फडणवीसांच्या घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. एसआयडीच्या रिपोर्टनंतर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गोपनीय रिपोर्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचं बोललं जात आहे.

केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अतिरिक्त फोर्स वनमधील १० ते १२ कमांडो तैनात केले आहेत. फोर्स वनमधील कमांडो हे फडणवीसांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना आधीच झेड प्लस सुरक्षा आहे. गुप्तहेर संस्थांना गेल्या काही दिवसात मिळालेल्या सूचनांचे आधारे त्यांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ करण्यात आलीये. त्या अंतर्गत फोर्स वनचे कमांडो त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट, अजित गट आणि भाजपच्या महायुतीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. महाराष्ट्रात भाजपलाही बंडखोराचा सामना करावा लागत आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी बंडखोर नेतेही आमचेच असल्याचे सांगितले. त्यांना समजून घेणे आमचं काम आहे. त्यांच्या डोक्यात राग असेल. पण त्यांचा भाव हा पक्षाप्रति आहे. भाजप बंडखोरांची बाजू समजून घेण्यात यशस्वी होईल, असे फडणवीसांनी सांगितले.

दरम्यान, शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार न करण्याचे ठरवले आहे.

ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं की, भाजपने नवाब मलिक यांच्या उमेदवारीचा विरोध केला होता. फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये, असं म्हटलं होतं. मात्र, अजित पवारांनी नवाब मलिकांना तिकीट दिलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, त्यांचा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध नाही. परंतु त्यांचा प्रचार करणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT