Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना महायुतीतील भाजपचा पाठिंबा मग शिवसेनेने का दिला उमेदवार? फडणवीसांनी सांगितली राजकीय खेळी

Maharashtra Election : माहिममध्ये अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर यांनी दंड थोपटले आहेत. परंतु त्यामागे राजकीय खेळी असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.
Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना महायुतीतील भाजपचा पाठिंबा मग शिवसेनेने का दिला उमेदवार? फडणवीसांनी सांगितली राजकीय खेळी
Amit Thackeray and Sada Sarvankar Saam Tv
Published On

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील माहिमधील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणजेच सदा सरवणकर यांनी शिवसेना, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला आव्हान दिलंय. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या पुत्राविरोधातच सदा सरवणकर यांनी दंड थोपटले आहेत. लोकसभेला पाठिंबा देऊनही अमित ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार का दिला? असा प्रश्न केला जात आहे.

माहिमची जागा जिंकता यावी, यासाठी ही रणनिती आखण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त लढत सुरू आहे. दोन्ही आघाड्यांनी एकमेकांच्या उमेदवारांविरोधात तगडा उमेदवार दिलाय. त्यात अंतर्गत वादामुळे दोन्ही आघाड्यातील पक्षांचं टेन्शन वाढलंय. इच्छुक उमेदवारांनीही पक्षांची धकधक वाढवलीय. अशीच एक जागा म्हणजे माहिम.

येथे राज'पूत्र' विरोधात शिवसेनेच्या उमेदवाराने दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे ही जागा मनसेला मिळावी यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी देवेंद्र फडणवीस आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली होती. मात्र त्यांच्या दबावाला न जुमानता सदा सरवणकर यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमित ठाकरें पुढील आव्हान वाढलंय. मात्र यामागे एक राजकीय खेळी असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना महायुतीतील भाजपचा पाठिंबा मग शिवसेनेने का दिला उमेदवार? फडणवीसांनी सांगितली राजकीय खेळी
Maharashtra Assembly Election 2024: मविआमधील तिढा सुटणार; नाशिक, भायखळासह अनेक ठिकाणी काँग्रेस घेणार माघार

अमित ठाकरेंना भाजपने पाठिंबा दिलाय. याबाबत बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आधीपासून आमची भुमिका होती की, राज ठाकरे यांनी या जागेसाठी पाठिंबा मागितला होता. त्यामुळे भाजपचा त्यांना पाठिंबा आहे. त्यानंतर शिवसेनेन त्या जागेवर उमेदवार का दिला, असा प्रश्न देवेंद्र फडवीस यांना विचारण्यात आला. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले, यामागे रणनिती आहे. भाजपप्रमाणे अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही होती. पण तेथील काही मत उद्धव ठाकरे गटाकडे जातील त्यामुळे त्यांनी उमेदवार दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com