Ajit Pawars Convoy Vehicle Accident Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Ajit Pawars Convoy Vehicle Accident: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला २२ नोव्हेंबरला अपघात झाला होता. या अपघातामध्ये चौघे जण जखमी झाले होते. यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

  • अग्निशमन दलाच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौघे जण जखमी

  • एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

  • तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू

योगेश काशिद, बीड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुसुम विष्णू सुदे (वय ३० वर्षे) असं मृत्यू झालेल्या महिलेचा नाव होते. कुसुम यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. अजित पवार प्रचारसभेसाठी जात असताना ही अपघाताची घटना घडली होती. या अपघातामध्ये चौघे जण गंभीर जखमी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार २२ नोव्हेंबर रोजी परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना अपघाताची ही घटना घडली होती. तेलगाव - धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे अपघात झाला होता. अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सुदे (३० वर्षे), त्यांचे पती विष्णू दामोदर सुदे (३५ वर्षे) आणि दोन लहान मुली रागिणी (९ वर्षे) आणि अक्षरा (६ वर्षे) हे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचा चुराडा झाला होता.

अपघातामध्ये दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या चौघांनाही स्थानिकांनी तत्परता दाखवत धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले होते. कुसुम सुदे यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण गंभीर दुखापतींमुळे उपचार सुरू असतानाच त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला.

कुसुम यांच्या निधनाने सुदे कुटुंबात तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दोन निष्पाप मुलींसह संपूर्ण कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने स्थानिक नागरिकांनी या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, जखमी विष्णू सुदे आणि त्यांच्या दोन्ही मुलींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे. या हृदयद्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात औधमधे अपघात, अपघातात वयोवृद्ध महिला जखमी

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

प्रिन्सिपलच्या छळाला कंटाळली; विद्यार्थिनीनं शाळेतच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'बॅड टच'

Gauri Garje Death Case: माझ्या मुलीला मारलंय; आत्महत्या नाही तर हत्याच, गौरीच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT