बीडच्या धूनकवड फाटा भागात अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झालाय.
अपघाताचे कारण स्पष्ट नसून सध्या तपास सुरू आहे
सर्व जखमींना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झालाय. बीडमधील धारूर मार्गे केजकडे जात असताना धूनकवड फाटा परिसरात हा अपघात झाला. या अपघातात चौघेजण जखमी झालेत. त्यांना धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. जमखींपैकी एकाची एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षानं ठरवलेल्या स्टार प्रचाराकांना विरोध होतोय. बीडमधील आमदार धनंजय मुंडेंनी प्रचारक म्हणून विरोध होऊ लागलाय. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळुंखे यांनी धनंजय मुंडेंना आपल्या भागात प्रचार करू नये, असं सांगितलंय. आपल्या भागात प्रचारासाठी त्यांनी येऊ नये, असं आमदार साळुंखे म्हणालेत. त्याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवलंय.
सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी ही क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील अणदूर परिसरात जीप आली असताना वाहनाचे टायर्स फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.