Latur Accident Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident : आठ दिवसांवर लग्न असताना मृत्यूने गाठले; अपघातात नवरदेव तरुणासह भावाचा मृत्यू

Latur News : लातूर- उदगीर महामार्गावरच्या लोहारा या ठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले
लातूर
: लग्न सोहळा असल्याने घरात सर्व तयारी झालेली होती. वधू - वराकडील मंडळी आनंदात होते. (Latur) परंतु अवघ्या आठ दिवसांवर लग्न सोहळा आला असताना नवरदेव मुलाला मृत्यूने गाठले. लग्नपत्रिका देण्यासाठी जात असताना दुचाकीला (Accident) अपघात होऊन नवरदेवासह चुलत भावाचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

लातूर- उदगीर महामार्गावरच्या लोहारा या ठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. दुचाकी वरील विशाल निलेवाड (वय २२) व आकाश निलेवाड (वय २३) अशी या मयत भावंडांची नाव आहेत. (Marriage) लग्नाकार्याच्या पत्रिका घेऊन नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात व निलेवाड कुटुंबीयांवर मोठी शोक कळा पसरली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८ दिवसांवर होते लग्न 

या अपघातातील मृत झालेल्या विशाल निलेवाड या युवकाचे येत्या १८ एप्रिलला विवाह होता. लग्न अवघ्या आठ दिवसांवर आले असल्याने घरातील सर्व तयारी झालेली होती. केवळ शेवटच्या टप्प्यातील लग्नाचे आमंत्रण देण्यासाठीच्या पत्रिका वाटप बाकी होत्या. या पत्रिका देण्यासाठी जात असतानाच नवरदेव मुलाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ये चला...विचारा..; आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नितेश राणेंकडून खिल्ली|VIDEO

Green Colour Saree: श्रावणात सणासुदीसाठी नेसा या हिरव्या रंगाच्या सुंदर साड्या

Malvan Tourism : 'मालवण'मधील Hidden पिकनिक स्पॉट, पावसाळ्यात करा फुल टू धमाल

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; योगेश कदमांचा इशारा

Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी हालत करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा

SCROLL FOR NEXT