जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Shiv Sena Leader Bharat Gogawale Slams Jarange Patil : नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना नेते भरतशेठ गोगावले यांनी जरांगे पाटलांच्या विधानांवर टीका केली.
Bharat Gogawale reaction to Manoj Jarange Patil allegations
Bharat Gogawale reaction to Manoj Jarange Patil allegationssaam tv
Published On: 
Summary
  • मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर भरत गोगावले यांचे प्रत्युत्तर

  • एकनाथ शिंदे यांच्यावरील ५०० कोटींच्या आरोपांमुळे राजकारण तापले

  • नारायणगड दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांचे विधान

सचिन कदम, साम प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील हे संधी साधूपणा करत आहेत. जरांगे पाटील उलट सुलट करू लागले तर त्यांना रायगडच्या मावळ्याचा शाप लागेल, असं म्हणत शिवसेना नेते भरतशेठ गोगावलेंनी जरांगेंच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलंय. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपावरून राज्यातील राजकारण तापलंय.

जरांगेंचा आरोपानंतर शिंदेसेनेच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. इतकेच नाही तर जरांगेंनी एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करणं सुरू केल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडूनही जरांगेंच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जाऊ लागलाय. शिंदे गटाचे नेतेही 'अरे ला काय रे' करू लागलेत. त्याच रोषात मंत्री भरत गोगावलेंनी जरांगेंच्या विधानाचा समाचार घेतलाय.

Bharat Gogawale reaction to Manoj Jarange Patil allegations
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांविरोधात जाणाऱ्यांना 2029ला पाडणार'; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

रामदास कदमांनंतर आता मंत्री आमदार भरत गोगावले यांनी जरांगेंना टोला लगावलाय. जरांगे पाटील हे संधी साधूपणा करत असून आमचे नेते त्यांना चोख उत्तर देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेलं मराठा समाजासाठी केलेलं काम कोणतीच जनता विसरणार नाही. त्यामुळे जरांगे पाटील काही उलट सुलट करायला लागले तर त्यांना रायगडच्या मावळ्याचा शाप लागेल, असं गोगावले म्हणालेत.

जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना गोगावले म्हणाले की, त्याने जे विधान केलं ते चुकीचं होतं. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी काम केलं तर तेव्हा शिंदे साहेब चांगले. ता ते उलट विधान करू लागलेत. याचाच अर्थ सर्व महाराष्ट्राला कळून चुकलंयक की, जरांगे हे संधी साधूपणा करत आहेत. जरांगेंना जशास तसं उत्तर देणं आमच्या मराठा लोकांनी सुरू केलंय. आतापर्यंत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी जे काही केलंय ते कोणीच विसरू शकत नाही. जर जरांगे एकनाथ शिंदेंवर आरोप करतील त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांना रायगडच्या मावळ्याचा शाप लागेल असं भरत गोगावले म्हणालेत.

दरम्यान सोमवारी झालेल्या नारायण गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला होता. एकनाथ शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. इतकेच नाही तर जरांगेंनी त्याबाबत आपण पुरावे देऊ असं सांगितलंय.

Bharat Gogawale reaction to Manoj Jarange Patil allegations
'शिंदेंनी माझ्या नावे भाजपकडून 500 कोटी घेतले का?'दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

दरम्यान मनोज जरांगेंच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी जरांगेंचा उल्लेख एकेरी नावाने करत आपण कोण आहोत हे बघावं असं म्हणत टोला लगावला होता. तसेच त्यांनी आरोपांना तथ्य असले पाहिजेत, काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही रामदास कदम म्हणाले होते. त्यावरून बोलताना जरांगे म्हणाले की, माझं कोणी वाईट करू शकत नाही. एवढं मी माझ्या समाजासाठी लढतोय. तो विषय सोडून द्या. पण मी उद्धवस्त होणार नाही, एवढा मराठा लेचापेचा नाहीये. त्याची काळजी करू नका. मी पाठपुरावा करु शकतो.

मी आधी कोणाबद्दल बोलत नाही. पण पुढे येऊन कोण बोललं, तर मी सोडत नसतो. कारण माझ्या समाजाच्या अस्तित्वाचा विषय आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या नारायण राणे दादांचा विषय घ्या मोठ्या. मी त्यांना कधी बोललो नाही. ना त्यांच्या मुलांना बोललो नाहीये. तसेच रामदासभाईंना सुद्धा बोललो नाही. एकेकाळी ते चांगल्या प्रकारे भगव्यासाठी लढत होते. लहान असताना ऐकून आहोत. चांगला लढणारा माणूस आहे, त्यामुळे मी काही बोलणार नाही. पण पुरावे पाहिजेत ना, उद्या 11 वाजता प्रेस घेऊन देतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com