'शिंदेंनी माझ्या नावे भाजपकडून 500 कोटी घेतले का?'दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange's Big Claim at Dussehra Rally: आता बातमी आहे जरांगेंनी शिंदेंवर टाकलेल्या 500 कोटींच्या बॉम्बची. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दसरा मेळाव्याच्या भाषणात उपमुख्यमंत्री शिंदेंवर मोठा आरोप केलाय. काय आहे हा आरोप? जरांगेंच्या नावानं भाजपकडून कुणी आणि किती कोटी रुपये लाटले? शिंदेंना जरांगेंनी काय आव्हान दिलंय? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
What did Manoj Jarange allege about Eknath Shinde and ₹500 crore?
What did Manoj Jarange allege about Eknath Shinde and ₹500 crore?saam tv
Published On: 

कुणबी नोदींच्या अंमलबजावणीसाठी महिन्याभरापूर्वीच मनोज जरांगेंनी राज्य सरकारला 90 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर आता नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनोज जरांगेंनी सरकारवर टीकेचे बाण सोडलेत. एव्हंढच नव्हे तर मेळाव्यात जरांगेंनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवूून दिलीये. अंतरवाली सराटीतील उपोषणादरम्यान पडद्यामागून घडलेल्या घडामोडींवरून जरांगेंनी गौप्यस्फोट केलाय.

What did Manoj Jarange allege about Eknath Shinde and ₹500 crore?
Who is Justice Shrihari Davare: उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या हाती घेतला धनुष्यबाण

जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा बॉम्ब टाकलाय. जरांगेंनी कोणता ग्ंभीर आरोप केलाय आणि शिंदेंना काय इशारा दिलाय त्यांच्याच तोंडून ऐका. मनोज जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांवर आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. त्यांच्या या आरोपांवर शिदेसेनेनं काय उत्तर दिलंय ते पाहूयात. मनोज जरांगेंच्या गंभीर आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या लढाईत नवा ट्विस्ट आलाय.

What did Manoj Jarange allege about Eknath Shinde and ₹500 crore?
दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी जनतेला कोणतं वचन दिलं? दुष्काळावर काय म्हणाल्या?

यावेळी जरांगेंनी फक्त एकनाथ शिंदेंचंच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदेंचंही नाव घेतलंय. त्यामुळे आगामी काळात जरांगे विरुद्ध शिंदे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मराठा आंदोलकांवरील गुन्हे असो की जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयटी विभागाकडून झालेली चौकशी जरांगेंनी शिंदेंना वेळोवेळी टार्गेट केलंय. अशातच आता दसरा मेळाव्यातून थेट जरांगेंनी शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब टाकल्यामुळे आता स्वत: शिंदे काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com