Manoj Jarange Patil: 'मराठ्यांविरोधात जाणाऱ्यांना 2029ला पाडणार'; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

Manoj Jarange Patil Warn To Government: आता बातमी आहे, मराठा आंदोलकांच्या मागणीसाठी जरांगेंनी आखलेल्य नव्या रणनीतीची. जरांगेंनी पुन्हा एकदा दसरा मेळाव्यातून चलो मुंबईचा नारा दिलाय. मात्र यावेळी जरांगे फुलप्रूफ प्लॅनिंगनं मुंबईत येणार असल्याचं दिसतंय. जरांगे पाटलांनी नारायणगडावरुन सत्ताधाऱ्यांना काय इशारा दिला. पाहूयात.
Manoj Jarange Patil Warns Leaders Over Maratha Demands Ahead Of 2029
Manoj Jarange Patil Warns Leaders Over Maratha Demands Ahead Of 2029
Published On: 
Summary
  • दसरा मेळाव्यातून सत्ताधाऱ्यांना राजकीय इशारा दिला.

  • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पुन्हा ‘चलो मुंबई’चा नारा दिला.

  • मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाचा प्रश्न त्यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी होता.

ऐकलतं बीडमधील नारायणगडावर दसरा मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक दिलीय...मात्र यावेळी सरकारनं दिलेल्या डेटलाईननंतरच जरांगे मुंबईत दाखल होणार आहे...सरकारला दिलेल्या मुदतीचा एक महिना संपला असून आता दोन महिने शिल्लक आहेत. त्यानंतर मुंबईत धडकण्यासाठी तयारीला लागण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा आंदोलकांना केलंय. दुसरीकडे जरांगे यावेळी फक्त समर्थकांना आवाहन देऊन थांबले नाहीत. तर विरोध करणाऱ्यांना २०२९ मध्ये पाडण्याचा इशाराही जरांगेंनी दसरा मेळाव्यात दिलाय.

नारायणगडावरील या दसरा मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ प्रशासनालाच नव्हे, तर थेट 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनाच टार्गेट केलयं. तीन महिन्यांची दिलेली मुदत आणि पुन्हा मुंबईत आंदोलनाची हाक यामुळे येत्या काळात राज्य सरकारसमोरील आव्हानं आणखी वाढण्याची चिन्ह आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com