Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

dombivli water cut residents protest against 36 hour shutdown : पावसाळा संपताच ऑक्टोबर महिन्यातच पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. डोंबिवलीत पाणीबाणी सुरू झाली असून, सलग ३६ तास पाणीपुरवठा बंदचा निर्णय घेतला असून, रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली असून, शटडाऊन रद्द करण्याची मागणी केलीय.
डोंबिवलीत पाणीप्रश्न पेटला, नागरिकांचा भडका, सलग ३६ तास पाणी बंदच्या निर्णयाविरोधात एमआयडीसी कार्यालयावर धडक
डोंबिवलीत एमआयडीसी निवासी परिसरात सलग ३६ तास पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला saam tv
Published On: 
Summary
  • डोंबिवलीकरांचा पाण्यासाठी आक्रोश

  • एमआयडीसी कार्यालयावर शेकडो नागरिक धडकले

  • ३६ तासांचा शटडाऊन रद्द करण्याची मागणी

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही | डोंबिवली

राज्यभर पाणीप्रश्न पेटला आहे. सरकारला कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे. दुसरीकडं मुंबईजवळच्या डोंबिवलीत पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. डोंबिवलीतल्या एमआयडीसी निवासी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येनं येथील नागरिक त्रासले आहेत. त्यात सलग ३६ तास पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात आता नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. शेकडो नागरिकांनी बुधवारी थेट एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली. ३६ तासांचा शटडाऊन रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यभरात कमी पावसामुळं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीव्र पाणीटंचाई आहे. जलसाठ्यांमधलं पाणी आटू लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्याला रहिवासी त्रासले आहेत. सलग ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जवळपास १०० नागरिकांनी बुधवारी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयावर धडक दिली. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा, पाण्याची गळती आणि चोरी थांबवा, तसेच आगामी ३६ तासांचा शटडाऊन रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली.

शेकडो नागरिकांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उत्स्फूर्तपणे एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता औदुंबर आलाट यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर पाण्याच्या प्रश्नाचा पाढा वाचला. तसेच अधिकाऱ्यांना जाबही विचारला. या मोर्चाबाबत कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, पण ते कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची भेट झाली नाही.

डोंबिवलीत पाणीप्रश्न पेटला, नागरिकांचा भडका, सलग ३६ तास पाणी बंदच्या निर्णयाविरोधात एमआयडीसी कार्यालयावर धडक
Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

शुक्रवार, शनिवार पाणीपुरवठा बंद

एमआयडीसीकडून शुक्रवार आणि शनिवारी असा सलग ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित शटडाऊनला नागरिकांची तीव्र विरोध दर्शवला आहे. आधीच पाणीपुरवठ्याची समस्या आहे. त्यात सलग ३६ तास पाणी बंद ठेवल्यास पाण्यावाचून अतोनात हाल होतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

डोंबिवलीत पाणीप्रश्न पेटला, नागरिकांचा भडका, सलग ३६ तास पाणी बंदच्या निर्णयाविरोधात एमआयडीसी कार्यालयावर धडक
Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com