Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

dombivli society fight: members clash captured on cctv : डोंबिवलीत एका हायफाय सोसायटीत सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, ते व्हायरल होत आहेत.

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली | साम टीव्ही

डोंबिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत सदस्यांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. सोसायटीतील काही इमारतींच्या सदस्यांमध्ये आधी वाद झाला. त्यानंतर काही सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डोंबिवलीच्या सोसायटीचा अंतर्गत वाद आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. सदस्यांच्या दोन गटांत सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. वाद अधिक चिघळल्यानंतर दोन गटांत हाणामारी झाली. एका गटातील सदस्यांनी काही कमिटी मेंबर्सना लोखंडी रॉडने मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झालेल्या सदस्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com