Latur Accident News : लातूरमध्ये भीषण अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू

latur Car and truck Accident : लातूरमधून अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लातूरमध्ये कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरच्या निलंगा-देवणी महामार्गावर ही अपघाताची घटना घडली.
Latur Accident News
Latur Accident NewsSaam tv

संदिप भोसले, लातूर

latur Accident Latest Update :

लातूरमधून अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लातूरमध्ये कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरच्या निलंगा-देवणी महामार्गावर ही अपघाताची घटना घडली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील निलंगा-देवणी महामार्गावरील धनेगाव पाटी येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने कारचा चुराडा झाला आहे.

Latur Accident News
Nana Patole Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भीषण अपघात

या भीषण अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती हे मध्य प्रदेशातील इंदोर येथील कपड्याचे होलसेल व्यापारी असल्याची माहिती मिळत आहे. ते व्यापारासाठी लातूरच्या उदगीरकडे त्यांच्या कारने प्रवास करत होते. त्याचेळी अपघात झाला.

Latur Accident News
Chhattisgarh Bus Accident News : 40 प्रवाशांसह नागपूरला निघालेल्या बसला साकोलीनजीक अपघात, छत्तीसगडचे प्रवासी जखमी

कसा झाला अपघात?

मध्य प्रदेशातील चार व्यापारी लातूरच्या उदगीरकडे प्रवास करत होते. उदगीररकडून निलंग्याच्या दिशेने जाणारे कार आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चार व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Latur Accident News
Nana Patole Accident: नाना पटोलेंचा अपघात की घातपात? अतुल लोंढे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप

उरणमध्ये भरधाव वाहनाची स्कुटीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू

उरण रेल्वे समोरील रस्त्यावर एका भरधाव वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटी चालक पवित्र बराल आणि रश्मिता बराल या दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.

वाहन चालकाने न थांबता कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळी उपस्थित नागरिकांना शिवीगाळ आणि मारहाण करून पळ काढला. या प्रकरणी वाहन चालक जय घरात याच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com