Chhattisgarh Bus Accident News : 40 प्रवाशांसह नागपूरला निघालेल्या बसला साकोलीनजीक अपघात, छत्तीसगडचे प्रवासी जखमी

Bhandara Marathi News : या अपघातामधील जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
three injured in bus accident at sakoli near bhandara
three injured in bus accident at sakoli near bhandarasaam tv

- शुभम देशमुख

Bhandara :

छत्तीसगडहून (chhattisgarh) प्रवाशांना घेऊन नागपूरकडे (nagpur) निघालेली एक खाजगी बस साकोलीजवळ (sakoli) तेली नाल्यासमोर उलटली. यामध्ये 40 प्रवासी (passengers) होते. त्यातील तिघे जण जखमी (injured) झाले. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना घडली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्तीसगडहून नागपूरकडे बस निघाली हाेती. साकोलीजवळील वनपरिक्षेत्रातील तेली नाल्याजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. यामध्ये तिघे जण जखमी झाले. (Maharashtra News)

three injured in bus accident at sakoli near bhandara
Unseasonal Rain Hits Akola: अकाेल्यात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस, आंब्यासह भाजीपाल्याचे नुकसान

यामध्ये धर्मेंद्र कोसले (वय 36, रा. खापरीकला, छत्तीसगड), त्यांची पत्नी गंगोत्री कोसले आणि अन्य एक जण जखमी झाले. इतर 37 प्रवासी थोडक्यात बचावले. जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

three injured in bus accident at sakoli near bhandara
Bacchu kadu : गारपिटीचा संत्रा उत्पादकांना फटका, नवीन धोरण आखणे गरजेचे : बच्चू कडू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com