Bacchu kadu : गारपिटीचा संत्रा उत्पादकांना फटका, नवीन धोरण आखणे गरजेचे : बच्चू कडू

Amravati Unseasonal Rain : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा चांदूरबाजार, मोर्शी वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्राचे उत्पादन घेतले जाते.
bacchu kadu visits orange gardens unseasonal rain in amravati
bacchu kadu visits orange gardens unseasonal rain in amravati saam tv

- अमर घटारे

Amravati :

नवीन वर्षी (marathi new year) शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांना मदत लाखात भेटणार नाही अशी अवस्था आहे असे बच्चू कडू यांनी अमरावती येथे नमूद केले. अमरावती जिल्ह्यामध्ये आज (मंगळवार) सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. त्यात शेती, फळबागांचे नुकसान झाले. कडू यांनी नुकसानग्रस्त भागात भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचे कडू यांनी नमूद केले. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यामध्ये आज सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. या गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे.

bacchu kadu visits orange gardens unseasonal rain in amravati
Shindawane Ghat Accident News : शिंदवणे घाटात माल वाहतुकीच्या वाहनास अपघात, युवकाचा जागेवरच मृत्यू; तिघे जखमी

गव्हाच्या पिकांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. संत्रा सुद्धा मोठ्या प्रमाणात खाली कोसळल्या असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला आंबिया बाहारातील संत्रा पूर्णपणे गारपिटीमुळे जमिनीवर गळून पडला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ केलेल्या संत्र्याचे पीक आता पूर्णपणे अडचणीत आले आहे. दरम्यान संत्रा पिकासाठी नवीन धोरण आखणे गरजेचे आहे असे आमदार बच्चू कडू यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

bacchu kadu visits orange gardens unseasonal rain in amravati
Satara Constituency: उदयनराजेंसाठी अजित पवार गट सातारा मतदारसंघ साेडण्यास तयार नाही, जाणून घ्या कारण (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com