महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी येत्या शुक्रवारी निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याच्या आदेशात आता बदल करण्यात आला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २३ ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार असल्याचा सुधारित आदेश काढण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या ड्राय डेच्या आदेशात तीन दिवस मद्य विक्री बंद करण्याच्या निर्णयाला आता न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आली आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांसह एकूण पाच आरोपींना मुंबई गुन्हे शाखा उद्या कोर्टात हजर करणार मुंबईतील शूटरसना लॉजिस्टिकल सपोर्ट केला चा या पाचही जणांवर आरोप आहे
हा ईमेल मिरा-भाईंदर-वसई-विरार मुख्यालयाला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाला.
ईमेल प्राप्त होताच भाईंदर पोलीस ठाण्यात पोलिसांकडून स्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. विरारमध्ये राहणाऱ्या ७२ वर्षीय उज्वला सावरकर यांच्या नावाने हा ईमेल पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात संबंधित महिलेची चौकशी सुरू आहे.
दादर पश्चिममध्ये १०२.६, तर प्रभादेवीमध्ये १०३.१ डेसिबल आवाजाची नोंद
मिरवणुकांमधील लेझर लाइट्स थेट वाहतूक आणि निवासी इमारतींच्या दिशेने
फटाक्यांमुळे धुराचे लोट; ध्वनिप्रदूषणासोबत प्रकाशप्रदूषणाचाही प्रश्न ऐरणीवर
सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांवर बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन झाल्याचा आवाज फाउंडेशनचा आरोप
दसरा सणानिमित्त नांदेडमधील हिंगोली गेट परिसरातील मैदानात चित्तथरारक घोडेस्वारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पंजाबमधून आलेल्या निहंग दलांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. बिंदीचंद दल, तारना दल आणि ९६ करोड़ी दलासह विविध दलांचे घोडेस्वार सहभागी झाले होते. जवळपास ३०० घोड्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. घोड्यावर स्वार होऊन शस्त्राच्या साहाय्याने गवताची पेंडी उचलण्याचे कौशल्य घोडेस्वारांनी सादर केले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती.
विशेष कार्यकारी न्याय दंडाधिकारी यांनी जामीन केला मंजूर
रांका आणि दास हे 7 दिवसांपासुन होते कोठडीत
जंतर मंतर येथे अनाधिकृतरित्या प्रवेश करून तिरंगा फडकावला त्यामुळे झाला होता गुन्हा दाखल
दास आणि रांका यांनी 50 हजारांच्या बॉन्ड चे उल्लंघन केल्याप्रकरणी सुनावली होती न्यायालयीन कोठडी
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची आज पाचव्यांदा चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखेने तब्बल सहा तास त्यांची चौकशी केली. यावेळी राम यांनी दाखवलेल्या व्हिडिओंबाबत विचारले असता, आपल्याला त्या व्हिडिओंबद्दल माहिती नसल्याचे राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. तसेच, संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याबाबत स्पष्टता देईन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रकरणातील चौकशीमुळे पुढे काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे भरदिवसा पेट्रोल पंप चालकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तोंडाला कपडा बांधून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून येत चालकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात वसीम अब्दुलरहीम अत्तार (वय ३५) जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
२ ते ५ महिन्यात देशात मोठी गडबड होईल - राज ठाकरे
बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात ही मागणी - राज ठाकरे
दिल्ली-NCR मधील हवेची गुणवत्ता खालावली असून वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) कालच्या १७९ वरून आज थेट २४४ वर पोहोचला आहे. हवा ‘खराब’ श्रेणीत गेल्याने वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) दिल्लीसह संपूर्ण NCR मध्ये GRAP-1 अंतर्गत उपाययोजना तातडीने लागू केल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवेची गुणवत्ता आणखी खालावू नये, यासाठी CAQM परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
वसई-विरार शहरातील तलावांमध्ये पडून अनेक तरुणांसह नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तलावांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने याविरोधात आंदोलन करण्यात आले. तलावांमधील बुडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. तलावांच्या परिसरात लवकरात लवकर सुरक्षा रक्षक नेमावेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक 179 वरून वाढून 244 वर पोहोचला असून हवा ‘खराब’ श्रेणीत गेली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी CAQM ने दिल्ली-NCR मध्ये GRAP-1 अंतर्गत उपाययोजना लागू करत संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. त्या अनुषंगाने खाजगी आस्थापना, खाजगी कंपन्या,मॉल्स, दुकाने व आस्थापना इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांना चार तासांची विशेष सवलत देणे आस्थापनावर बंधनकारक आहे.
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. टायगर श्रॉफवर हल्ला करणारे आरोपी कोर्टात हजर राहिले आहेत.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. अनेक मतदारसंघांत एकापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज कायम असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवार आणि मतदारसंघांची अधिकृत यादी उशिराने जाहीर होणार असल्याने आता अंतिम चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.
जोशी शाळेजवळील पुलावर एका तरुणाने लटकून गोंधळ घातल्याची घटना समोर आली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित तरुण नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. तरुण पुलावर लटकत असल्याचे पाहून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली, तर काही धाडसी तरुणांनी पुढाकार घेत त्याला सुरक्षितपणे पुलाच्या बाजूला आणले. या तरुणांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली असून, खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. बँकेत दहा वर्षे संचालक राहिलेल्या उमेदवारांच्या पात्रतेसंदर्भातील निर्देशांमुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
बीडच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस असा राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळाला. त्यावेळेस डोंगरकपाऱ्यातील माझा दसरा मेळावा कोणाच्या डोळ्यात खुपतो, असा सवाल मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला होता. आता याच विधानावर आमदार सुरेश धस यांनी जोरदार पलटवार केलाय.
अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई न करता व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाची संधी देण्याच्या उद्देशाने पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ ३ ने पुढाकार घेतला आहे. एनडीपीएस कायदा कलम ६४अ अंतर्गत १२ जणांना व्यसनमुक्ती उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले असून, उर्वरित तीन जणांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात गुजरातमधून आणखी एका आरोपीला अटक
बडोदा येथून अंकितला पोलिसांनी घेतले ताब्यात
अंकितला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक
फायरिंग प्रकरणाच्या तपासाला वेग; मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू
पालघरमधील बोईसरच्या पूर्वेकडील वारंगडे येथे विराज प्रोफाइल कंपनीच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक आदिवासी आणि नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकल्पामुळे नैसर्गिक परिसराचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करत स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीयांना प्राधान्य दिलं जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
शहरातील मगनपुरा येथील स्वामी समर्थ मंदिरात चोरीची घटना घडली आहे. एका महिलेने मंदिरातील एक किलो वजनाचा चांदीचा तांब्या आणि दोन चांदीचे ग्लास चोरल्याची माहिती समोर आली आहे. चोरी करताना महिलेने स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चांदीच्या वस्तू चोरणाऱ्या महिलेचा शोध नांदेड पोलीस घेत आहेत.
उत्तर प्रदेशातील व्यापारी शिवा शर्मा यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रद्धा दुबे हिच्यासह तीन आरोपींना नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यातून न्यायालयात नेण्यात आले. उत्तर प्रदेश पोलीस आरोपींच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार असल्याची माहिती आहे. रिमांड मिळाल्यानंतर संध्याकाळी आरोपींना लखनऊ येथे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लखनऊ येथील व्यापारी शिवा शर्मा यांच्या हत्येच्या आरोपाखाली श्रद्धा दुबे हिला तिच्या साथीदारांसह अटक करण्यात आली आहे.
CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. “हे प्रकरण आज दुपारी २ वाजता विशेष कार्यकारी समितीसमोर (SEM) येणार असताना तुम्ही उच्च न्यायालयात का आला आहात?” असा सवाल न्यायालयाने केला. SEM समोरील सुनावणीत काय होते, हे पाहून त्यानंतर पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करावा, असे न्यायालयाने सुचवले. तसेच, SEM समोर प्रकरण येणार असताना उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्याचा आग्रह का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाड यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या विशाल माधवराव बिच्चेवाड याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ‘तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग आणि आधी… गोळ्या घालेन,’ अशी धमकी त्याने दिल्याची माहिती आहे. धमकी देणाऱ्याला घरमालकानेच लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले. लोणीकंद पोलिसांनी विशाल बिच्चेवाड याला पुढील कारवाईसाठी ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस
महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांची निवडणुकीतून माघार
आमदार इद्रिस नायकवडी यांनी घेतली उमेदवार मागे
अर्ज माघारीच्या आधी जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांसोबत नायकवडींची झाली बैठक
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या बिनविरोधीच्या दृष्टीने सुरू आहे बैठक
जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने हालचालींना आला वेग
दुर्गोत्सव आणि दसऱ्यानिमित्त काल भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात जितेंद्र बोंद्रे यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रात्रीला जेवण केल्यानंतर पहाटेपासून गावातील सुमारे ३०० पेक्षा अधिक नागरिकांना जुलाब, उलटी आणि मळमळचा त्रास जाणवू लागला.
या नागरिकांना तातडीने खराशी येथील उपकेंद्रात दाखल करण्यात आलं.
तर, काहींना भंडारा आणि पालांदूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार
२२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहेत
अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत परिसरातील पाच गावांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला आहे.
आलापल्ली ते खांदला या २२ किलोमीटरच्या रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने आदिवासी बांधवांनी पायी लाँग मार्च सुरू केला आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणुकित महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
आज अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपला ५ तर शिवसेना-राष्ट्रवादीला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे
जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमध्ये दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत्यांच्या स्वतंत्र बैठका सुरू आहे
भाजपची स्वतंत्र बैठक सुरू आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र बैठक सध्या एका हॉटेलमध्ये सुरू आहे
- भोंदू अशोक खरातविरोधात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचार आणि विनयभंग प्रकरणी आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी
- भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात करण्यात येईल हजर
- गेल्या सुनावणीत फसवणुकीच्या गुन्ह्यात अशोक खरातला १४ दिवसांची देण्यात आली होती न्यायालयीन कोठडी
- भोंदू अशोक खरातला आज लैंगिक अत्याचारातील गुन्ह्यात न्यायालयात करण्यात येईल हजर
- अशोक खरातविरोधात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीत आज काय होते याकडे लक्ष
४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद
महापालिकेच्या वरळी येथील भूखंडाचे बाजारमूल्य सुमारे ४०० कोटी रुपये
मात्र ५६ कोटी रुपयांना भाडेपट्ट्याने देण्याची तयारी महापालिका करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय
या व्यवहारामुळे महापालिकेला सुमारे ३४४ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केला
हा प्रस्ताव गुरुवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जाणार त्यामुळे बैठकीत या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता
दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2 दिवसापासून दिल्लीत
तिन्ही नेते एकत्रित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार
राष्ट्रपतींची भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाचे देणार निमंत्रण
31 ऑक्टोबरला दुपारी नाशिक मध्ये होणार कुंभमेळ्या चा ध्वजारोहण समारंभ
नंदुरबार - सातपुड्यात काठी गावात दसऱ्यानिमित्त घोड्यांच्या शर्यतीची अनोखी परंपरा
शर्यतीसाठी 800 मीटरचा ट्रॅक 50 हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती
सुरक्षेसाठी बाल घोडेस्वार आणि चाबूक वापरण्यावर बंदी
दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल
दिवेआगार समुद्र किनारी 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी कारवाई
क्लासच्या शिक्षकांवर निष्काळजीपणाचा ठपका
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
दिवेआगर दुर्घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता
या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे आणि घटनाक्रमाबाबत आज त्यांच्या मुलगा राम पूर्णेकर तसेच त्यांच्या वकिलांकडून महत्त्वाची माहिती समोर ठेवली जाणार आहे.
या संदर्भात आज मानपाडा येथे दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत हत्या प्रकरणाशी संबंधित नेमके कोणते पुरावे सादर केले जाणार
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत वारकरी संप्रदाय आणि नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
ठाण्यातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
महाराष्ट्रात दुष्काळ, मग डेटा सेंटरसाठी पाणी कुठून आणणार?
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
प्रकल्पाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी आणि फेरविचार होईपर्यंत ठाण्यातील डेटा सेंटरला स्थगिती द्या, संजय राऊतांची मागणी
ठाण्यातील निवासी भागात प्रस्तावित डेटा सेंटरला स्थानिक नागरिकांचा विरोध
ठाणेकरांवर डेटा सेंटर लादल्याचा संजय राऊतांचा आरोप
मुंबई - टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका
अभिनेता अक्षय कुमारच्या घरावरही बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरू
अक्षय कुमारही होता बिश्नोईच्या निशाण्यावर
आरोपींनी अक्षयच्या ही घरची रेकी केल्याची पोलीस सूत्रांची माहिती.
अक्षय कुमारच्या घराबाहेरही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत..
याआधी सलमान खानच्या घरावर देखील बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरु
सलमान खानच्या घरावर यापूर्वीही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या त्या आता अपग्रेड करण्यात येत आहेत
रायगड जिल्ह्यातील रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
ढोल ताशांचा गजर आणि सनई चौघड्यांच्या पारंपरिक वादनात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यला उपस्थिती लावली
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी शिवारातील माऊली नगर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडिया पाहण्यासाठी बसलेल्या महिलांजवळ वाहनाचा प्रखर लाईट पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित घटनेत झाले.
या वादात चाकूने वार करण्यात आल्याने किरण विठ्ठल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी करण्यासाठी रिक्षाचालकांची मदत.
आरोपींना कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटीला लक्ष्य करण्याचे शूटर्सना निर्देश असल्याची पोलीस सूत्रांची
सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना धक्का
10 वर्षे संचालक पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या 100 पेक्षा जास्त जिल्हा बँकेच्या संचालकांना धक्का
बॅंकिंग सुधारणा कायदा 2025 नुसार जिल्हा सहकारी बँकांच्या संचालक पदावर 10 वर्षच राहता येणार
RBI ने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना बडतर्फी केल्यानंतर उच्च न्यायालयानेही RBI च्या निर्णयाला स्थगिती देण्यास दिला होता नकार
तुळजाभवानी मंदिरात परिसरात हाणामारीची घटना
नगरचे पुजारी व तुळजाभवानीचे पुजारी यांच्या तुंबळ हाणामारी
बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षकासमोरच सगळा घडला प्रकार
नगरच्या पुजार्यांकडून देवीचा पलंग विसर्जित करताना घडला प्रकार
शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या जीवाला धोका? मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून सुरक्षेची मागणी
आपल्या घराची आणि कार्यालयाची तीन वेळा रेकी करण्यात आल्याचा उल्लेख
राहुल कनाल यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध आहेत.
पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन
दोन वेळा मुदतवाढ देऊनही जमीन संपादनासाठी संमती न मिळाल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड
रात्री हॉटेलची वेळ संपल्याने आलेल्या तरुणांना हॉटेल बंद झाल्याचे सांगून जेवण न दिल्याच्या रागातून केला प्रकार
- नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडणाऱ्या दोन तरुणांना एसडीआरएफ च्या बचाव पथकाकडून जीवनदान
- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरात आलेल्या भीम अनुयायांची अंबाझरी तलावाजवळ अंघोळीसाठी गर्दी होत असते
- अशातच काल अंघोळीसाठी आलेले दोन तरुण तलावात बुडत एसडीआरएफच्या बचाव पथकाला दिसले
चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई
समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘टास्क फोर्स’
राणा सूर्यवंशी यांची प्रकृती अद्याप गंभीर,रुबी हॉल क्लिनिकची माहिती
राणा सूर्यवंशी यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले
जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने प्रकृती सुधारण्यास वेळ लागणार
पुढील ४८ तास अतिदक्षता विभागाच्या पथकाच्या देखरेखीखाली ठेवणार
मुंबई - टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शस्त्र पुरवठ्याच्या साखळीचा तपास
टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह चार जणांना अटक
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने २० ऑक्टोबर रोजी केली कारवाई
नंदुरबार - आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आणि आश्रमशाळांच्या दुरवस्थेवरून पुन्हा एकदा रान पेटण्याची शक्यता
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारला थेट इशारा
25 ऑक्टोबरला मुंबईत होणार आदिवासी विद्यार्थ्यांच्या जन आक्रोश मोर्चा
परवानगी नसली तरी शिवाजी पार्कवर धडकणारच विद्यार्थ्यांचा आरपारच्या लढाईचा एल्गार
आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.