Ambegaon News: कुकडी प्रकल्पातील डिंभे जलाशयात ३२ टक्केच पाणीसाठा; पाणी टंचाईचे संकट

Kukadi Canal Water Level News: यंदा पाऊस कमी झाल्याने नदी, धरणात पाणीसाठा जास्त प्रमाणात साचला नाही. धरणात असलेला पाणीसाठा आता वाढत्या पाणीसाठ्यामुळे झपाट्याने कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे
Kukadi Canal
Kukadi CanalSaam tv

Kukadi Canal Water Level

:

आंबेगाव तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या डिंभे धरणातील (Ambegaon) पाणीसाठ्यात झपाट्याने घाट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे सद्यस्थितीला धरणात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शेतीसह पिण्याच्या पाणी टंचाईचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Kukadi Canal
Pimpri chinchwad crime : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक; लुबाडणूक करणारी टोळी ताब्यात

यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने नदी, धरणात पाणीसाठा जास्त प्रमाणात साचला नाही. धरणात असलेला पाणीसाठा आता वाढत्या पाणीसाठ्यामुळे झपाट्याने कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वाढत्या उन्हामुळे (Kukadi canal) कुकडी धरणात असलेला पाणी साथ देखील कमी होत असून परिसरात पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागणार आहे.  (Maharashtra News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kukadi Canal
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता; खडसेंचे निकटवर्तीय जाणार भाजपात?

कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठी धरण म्हणुन डिभे धरणाकडे पाहिलं जाते. शेती आणि पिण्याच्या पाण्याची तहाण या धरणाच्या पाण्यातुन भागवली जाते. दरम्यान यंदाचा कडाक्याच्या उन्हामुळे धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यातच कालवा आणि नदीपात्रातुन सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने दुष्काळी परिस्थितीची चिंता वाढली आहे. यामुळे आगामी काही दिवसात या भागात देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com