

तेलंगणात शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना २ कोटींची मदत मिळणार
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोठी घोषणा केली.
यावेळी त्यांनी पोलीस भरतीबाबत देखील मोठी घोषणा
२०२८ पर्यंत तेलंगणा पोलमस दलातील रिक्त पदे भरणार
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोठी घोषणा केली. कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई त्यांनी जाहीर केली. राष्ट्रीय पोलिस स्मृती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी २०२८ पर्यंत पोलीस दलातील सर्व रिक्त पदे भरली जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना पोलिस दलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी होमगार्डसाठीची सानुग्रह रक्कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची देखील घोषणाही केली. त्यांनी हैदराबादमधील गोशामहल पोलिस स्टेडियम येथील पोलिस शहीद स्मारकात आयोजित पोलिस स्मृती दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली.
तेलंगणामध्ये ११० डीएसपी पदांती भरती होणार आहे. डीएसपी पदांच्या भरतीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, ११० डीएसपी पदांची भरती हे तेलंगणाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व पाऊल आहे. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना महिला आणि बालकांशी संबंधित प्रकरणे अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याचे आणि न्याय देण्यास विलंब टाळण्याचे आवाहन यावेली केले.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात असे पोलिसांना आवाहन केले. त्यांनी तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवणे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यममंत्री रेवंत रेड्डी यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.