Mumbai Police: इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले

Mumbai News: मुंबईतील महिला पोलिसाला ११ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो सांगत सायबर भामट्याने मोठी फसवणूक केली.
Mumbai Police:  इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले
Mumbai PoliceSaam Tv
Published On
  • मुंबईत महिला पोलिस शिपाई सायबर फसवणुकीची शिकार

  • लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून महिला पोलिसाची फसवणूक

  • लंडनवरून महागडे गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून फसवणूक

  • गिफ्ट सोडवण्यासाठी ११ लाखांचा गंडा घातला

संजय गडदे, मुंबई

सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता चक्क मुंबई पोलीस दलातील महिला शिपाईच सायबर फसवणुकीची शिकार झाल्याचे समोर आले आहे. लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या व्यक्तीने आपण लंडनमध्ये राहत असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवण्याच्या नावाखाली विविध कारणे सांगून तिच्याकडून तब्बल ११ लाख १४ हजार ८५० रुपये उकळल्याचा प्रकार घडला.

तक्रारदार महिला सुमारे ३० वर्षांची असून मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. सध्या तिची नेमणूक वांद्रे पोलीस ठाण्यात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. कौटुंबिक कारणांमुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये तिने पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ती मुलासोबत सांताक्रुझ येथील पोलीस वसाहतीत राहत आहे.

Mumbai Police:  इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले
Mumbai News : मुंबईत धक्कादायक प्रकार! बनावट पोलीस बनून खंडणी उकळली; असा सापडला जाळ्यात

ऑगस्ट २०२६ मध्ये तिने एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर दुसऱ्या लग्नासाठी स्वतःचे प्रोफाइल तयार केले होते. याच दरम्यान तिची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने आपले नाव रवीकुमार असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. आपण लंडनमध्ये राहत असून तेथे व्यावसायिक असल्याचे तसेच त्याच्या मालकीच्या विविध कंपन्या असल्याचे त्याने सांगितले.

Mumbai Police:  इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले
Mumbai News: मुंबईकरांनो सावधान! अमूल-गोकुळच्या नावाखाली दुधात भेसळ, ७४ लिटर साठा जप्त

दरम्यान, आरोपीने लंडनमध्ये त्याला महागडे वाहन मिळाल्याचे सांगत त्याचा फोटोही महिलेला पाठवला. त्यानंतर तिला लंडनहून काही महागडे गिफ्ट पाठवणार असल्याचे सांगितले. ४ सप्टेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने फोन करून आपण विमानतळ प्राधिकरणातून बोलत असल्याचे सांगितले. रवीकुमारने लंडनहून महिलेच्या नावाने महागडे गिफ्ट पाठवले असून ते सोडवण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. महिलेने रवीकुमारशी संपर्क साधून खात्री केली. त्याने होकार दिल्यानंतर महिलेने संबंधित रक्कम पाठवली.

Mumbai Police:  इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले
Mumbai News: शाळेत न जाता पोहायला गेले, पाण्याच्या टाकीत बुडून २ मुलांचा मृत्यू; मुंबईतील दुर्दैवी घटना

यानंतर गिफ्टमध्ये परकीय चलन आणि सोन्याचे दागिने असल्याचे सांगत विविध शुल्कांच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करण्यात आली. आरोपींवर विश्वास ठेवून महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल ११ लाख १४ हजार ८५० रुपये पाठवले. यानंतर संबंधित व्यक्तीने महिलेच्या आधारकार्डचीही मागणी केली. या प्रकारामुळे संशय निर्माण झाल्यानंतर महिलेने अधिक चौकशी केली. त्याचवेळी आरोपीने त्याचा मोबाईल आणि वॉलेट चोरीला गेल्याचे सांगत पुन्हा पैसे मागितले. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

Mumbai Police:  इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले
Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधला. तसेच पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी रवीकुमार नाव सांगणाऱ्या भामट्यासह पैसे ज्या खात्यांमध्ये जमा झाले त्या लाभार्थी खातेदारांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Police:  इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले
Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com