Mumbai News : मुंबईत धक्कादायक प्रकार! बनावट पोलीस बनून खंडणी उकळली; असा सापडला जाळ्यात

Fake Police in Andheri Chakala : अंधेरीच्या चकाला परिसरात स्वतःला पोलीस असल्याचे भासवत पानटपरी चालकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तत्काळ अंधेरी पोलिसांशी संपर्क साधताच एक आरोपी ताब्यात घेण्यात आला, तर त्याचा साथीदार फरार झाला. बनावट ओळखपत्राचा वापर करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Mumbai News : मुंबईत धक्कादायक प्रकार! बनावट पोलीस बनून खंडणी उकळली; असा सापडला जाळ्यात
Mumbai News : मुंबईत धक्कादायक प्रकार! बनावट पोलीस बनून खंडणी उकळली; असा सापडला जाळ्यातchatgpt
Published On

मुंबईच्या अंधेरी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बनावट पोलीस असल्याचे भासवून खंडणी उकळण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. चकाला परिसरात एका पानटपरी चालकाकडे आरोपी खंडणी मागितली . कारवाई करण्याची धमकी पानटपरी चालकाला दिली. पानटपरी चालकाने प्रसंगावधान राखल्याने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पण पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाल्याने पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

अंधेरीच्या चकाला परिसरात बनावट पोलीस असल्याचे भासवून पानटपरी चालकाकडून १० हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न अंधेरी पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात दीपक सिंग याला ताब्यात घेण्यात आले असून त्याचा साथीदार गुलाब ठाकूर फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Mumbai News : मुंबईत धक्कादायक प्रकार! बनावट पोलीस बनून खंडणी उकळली; असा सापडला जाळ्यात
Mumbai : मुंबई हादरली! सख्ख्या भावाकडून कुटुंबातील २ जणांची हत्या; धक्कादायक कारण समोर

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २ ऑगस्ट रोजी दीपक सिंग आणि गुलाब ठाकूर हे चकाला परिसरातील चंपारण हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवणानंतर दीपक सिंग शेजारील पानटपरीवर गेला. त्याने स्वतःला पोलीस असल्याचे भासवत पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांच्या नावाचे ओळखपत्र दाखवले. हे ओळखपत्र २०११ सालातील असल्याचे सांगितले जात असून त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे.यानंतर पानटपरी चालकाला, "तुझ्या गुटखा विक्रीचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. कारवाई टाळायची असेल तर १० हजार रुपये द्या," अशी धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र, पानटपरी चालकाला संशय आल्याने त्याने तातडीने अंधेरी पोलिसांशी संपर्क साधला.

Mumbai News : मुंबईत धक्कादायक प्रकार! बनावट पोलीस बनून खंडणी उकळली; असा सापडला जाळ्यात
Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

माहिती मिळताच अंधेरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच गुलाब ठाकूर फॉर्च्युनर कारमधून फरार झाला, तर दीपक सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपासात गुलाब ठाकूरने मिरा रोड येथील आपल्या भावाच्या इमारतीत फॉर्च्युनर कार पार्क करून तेथूनही पलायन केल्याची माहिती समोर आली.

तपासात गुलाब ठाकूरविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची बाबही उघड झाली आहे. दोघांनीही पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून पोलीस असल्याचे भासवत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असून अंधेरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com