Mumbai : मुंबई हादरली! सख्ख्या भावाकडून कुटुंबातील २ जणांची हत्या; धक्कादायक कारण समोर

Mumbai Vikroli Crime News : मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईट परिसरातील राहुल नगर येथे कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले. दोन भावांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
VIKHROLI FAMILY DISPUTE TURNS DEADLY: TWO KILLED, TWO CRITICALLY INJURED IN RAHUL NAGAR MUMBAI
VIKHROLI FAMILY DISPUTE TURNS DEADLY: TWO KILLED, TWO CRITICALLY INJURED IN RAHUL NAGAR MUMBAISaam Tv
Published On
Summary
  • विक्रोळी पार्कसाईटमधील राहुल नगर येथे कौटुंबिक वादातून रक्तरंजित हल्ला

  • धारदार शस्त्राच्या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोकचा मृत्यू

  • दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू .

  • पोलिसांनी तपास सुरू केला आहे

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरातील राहुल नगर येथे कौटुंबिक वादाचे भीषण रूप पाहायला मिळाले. एकाच कुटुंबातील तीन भावांमध्ये झालेल्या वादातून दोन भावांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. त्यापैकी दोघे घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. पहाटेच्या सुमारास सुनील विश्वकर्मा (वय 40) यांनी मोठ्या आवाजात गाणी लावल्याने त्यांचे भाऊ सुरेंद्र आणि सूरज यांनी त्यांना याबाबत जाब विचारला. यावरून तिघांमध्ये वाद झाला आणि काही वेळातच या वादातून हाणामारी सुरु झाली.

VIKHROLI FAMILY DISPUTE TURNS DEADLY: TWO KILLED, TWO CRITICALLY INJURED IN RAHUL NAGAR MUMBAI
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

संतापाच्या भरात सुरेंद्र आणि सूरज यांनी धारदार शस्त्राने सुनील विश्वकर्मा तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा गंभीर जखमी असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

VIKHROLI FAMILY DISPUTE TURNS DEADLY: TWO KILLED, TWO CRITICALLY INJURED IN RAHUL NAGAR MUMBAI
Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुरेंद्र विश्वकर्मा व सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या वादाचे कारण मोठ्या आवाजात गाणी लावणे असल्याचे समोर आले असले, तरी या हल्ल्यामागे इतरही काही कारणे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com