Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

Andheri News: मुंबईतल्या अंधेरीमध्ये नाल्यात कचरा टाकणारे ड्राय वेस्ट वाहन पकडले. BMCची ठेकेदार संस्थेला शो-कॉज नोटीस देण्यात आली. ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले.
Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस
Mumbai NewsSaam Tv
Published On
  • ड्राय वेस्ट वाहनातून नाल्यात कचरा टाकल्याचा प्रकार

  • अंधेरी लोखंडवाला कचरा प्रकरणात BMCची कारवाई

  • नाल्यात कचरा टाकणाऱ्या कंत्राटदाराला BMCची नोटीस

  • लोखंडवाला ओशिवरा नाल्यात कचरा टाकल्याची तक्रार

संजय गडदे, मुंबई

अंधेरीतील लोखंडवाला परिसरात BMCकडून तैनात करण्यात आलेल्या ड्राय वेस्ट कलेक्शन वाहनातून नाल्यात कचरा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ एका रहिवाशाने शूट केल्यानंतर तो स्थानिक रहिवाशांकडे शेअर केल्यानंतर x वरून पोस्ट करण्यात आला. त्यानंतर BMCच्या के-वेस्ट विभागाने संबंधित एजन्सीला शो-कॉज नोटीस बजावली असून, समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कामाचा आदेश रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

ग्रीन एकर्स हाउसिंग सोसायटीकडून नाल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्राय वेस्ट कलेक्शन वाहन कचरा रिकामा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. या प्रकाराची तक्रार 14 सप्टेंबर रोजी Xच्या माध्यमातून BMCकडे करण्यात आली. त्यानंतर के-वेस्ट विभागाने 15 सप्टेंबर रोजी संबंधित एजन्सीला पत्र पाठवून खुलासा मागवला. BMCच्या माहितीनुसार, ड्राय वेस्ट कलेक्शन वाहनातून जमा करण्यात आलेला कचरा हा निर्धारित ड्राय वेस्ट सॉर्टिंग सेंटरमध्येच नेणे बंधनकारक आहे. नाल्यात कचरा टाकणे हे कामाच्या आदेशातील अटींचे उल्लंघन असल्याचे पालिकेने संबंधित संस्थेला कळवले आहे.

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस
Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

या प्रकरणात BMCने वाहनाच्या हालचाली तपासण्यासाठी व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम (VTMS) मधील अहवालाचीही तपासणी केली. 15 सप्टेंबर रोजी तयार करण्यात आलेल्या वाहन प्रवास अहवालातून संबंधित वाहनाची हालचाल तपासण्यात आली असून, अहवालात संबंधित कंत्राटदाराची नोंद असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.

संबंधित एजन्सीला 48 तासांच्या आत नाल्यात कचरा का टाकण्यात आला, याचे समाधानकारक स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास वर्क ऑर्डर रद्द करण्यासह संबंधित संस्थेचे ड्राय वेस्ट सॉर्टिंग सेंटर बंद करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही BMCने दिला आहे.

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस
Mumbai : मुंबईकरांना मोठा दिलासा! ७ तलावांमध्ये ९६.६१ टक्के पाणीसाठा, जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, लोखंडवाला-ओशिवरा परिसरातील नागरिकांनी नाल्यात कचरा टाकण्याच्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. नाल्यातील पाणी पुढे समुद्राकडे वाहत असल्याने अशा प्रकारामुळे पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ड्राय वेस्ट वाहनांवर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस
Mumbai : मुंबईत अग्नितांडव! नामांकित रुग्णालयात गॅस सिलिंडरचा स्फोट; २ कर्मचारी होरपळले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com