आता बातमी महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रंगलेल्या स्पर्धेची....एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री करण्यासाठी शिंदेसेनेनं फिल्डिंग लावलीय...संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदेसेनेनं नेमकी काय रणनीती आखलीय? गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचा पराभवामुळे शिंदेसेनेनं भाजपला कसं खिंडित गाठलंय? पाहूयात या रिपोर्टमधून...
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं महायुतीच्या पैलवानांना अक्षरशा: धूळ चारली... अशातच महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या शिंदेसेनेनंही विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला थेट आव्हान दिलयं...पुणे शिक्षक मतदारसंघातील मैत्रपूर्ण लढत महायुतीतील वाद चव्हाट्यावर आणणारी ठरतेय... मंत्री जयकुमार गोरेंनी शिंदेसेनेचे उमेदवार सचिन सानपांना ओळखत नसल्याचं विधान केलं... त्यामुळे शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी गोकुळच्या पराभवाचा दाखला देत भाजपच्या जखमेवर मीठ चोळलंय.
शिंदेसेनेतील मंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत. तर थेट आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धारच व्यक्त केलाय. आता संख्याबळ नसलं तर आगामी निवडणुकात संख्याबळ वाढवून पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा निर्धार शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी जाहीरपणे व्यक्त केलाय.
आता विरोधात गेलेला गोकुळचा निकाल आणि त्यानंतर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत जाहीरपणे केलेलं विधान पाहता महायुतीत शिंदेसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ऐन विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतलेी अंतर्गत स्पर्धा समोर आल्यामुळे त्याचा निकालावर परिणाम होणार का? भाजप शिंदेसेनेच्या या जाहीर विधानांवर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.
सूरज मसूरकर, साम टिव्ही, मुंबई
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.