Ahmednagar News : महाराष्ट्रातील या गावात हनुमंताचे नावही घ्यायला घाबरतात; जिथे होते फक्त दैत्याची पूजा

Ahmednagar news : दैत्य महाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते. गावाची ओळख हि दैत्यांच्या नावाने आहे.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

सुशील थोरात

अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दैत्यनांदूर हे असे गाव आहे; जेथे दैत्याची आराधना केली जात (Ahmednagar) असते. अशा प्रकारे दैत्याची आराधना करणारे देशातील हे एकमेव गाव असून या आगळ्या वेगळ्या दैत्यनांदूर गावात श्री निंबादैत्य महाराजांचा यात्रा उत्सव देखील भरविण्यात येत असतो. ग्रामस्थ मंडळींकडून पाडवा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवली जाते. (Live Marathi News)

Ahmednagar News
Sanjay Raut: राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली; संजय राऊत यांचा सवाल

अहमदनगर जिल्ह्यातील या गावाचा अनोखा महिमा असून या गावाचे दैत्य महाराज हे ग्रामदैवत आहे. गावात हनुमंताचे नाव घेता येत नाही. जाणीवपूर्वक एखाद्याने घेतलंच तर त्याला विचित्र अनुभव येतो, याची प्रचिती ग्रामस्थांना आहे. (Pathardi) पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे की, जिथं दैत्य महाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते. गावाची ओळख हि दैत्यांच्या नावाने आहे. विशेष म्हणजे हा दैत्य नवसाला पावतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ahmednagar News
Unseasonal Rain : खामगाव तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्याचा कहर; अवकाळी पावसाने केले पिकांचे मोठे नुकसान

अशी आहे आख्यायिका 
पोथी पुरानात उल्लेख असल्याप्रमाणे निंबादैत्य व हनुमंत दोघांत घनघोर असे गदा युद्ध होते. त्यात दोघही जखमी होतात. निंबादैत्य प्रभु रामाचा धावा करतो. त्यामुळे हनुमंत आश्चर्यचकीत होतो. प्रभू राम येतात आणि निंबादैत्याला बरे करतात आणि वर देत या गावात तुझेच नाव निघेल. तुझे मंदिरही बांधले जाईल. रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात, तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल, असे सांगितले आहे. मग हे कसे. त्यावर प्रभू राम म्हणतात, गाव तुझेच. इथे हनुमंताचे मंदिर नसेल आणि नावाचा उल्लेखही निघणार नाही.

मुलाचंही नाव कोणी मारूती, हनुमान ठेवले जात नाही. दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही पाळत आहे. इथला भूमिपूत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच. घर, गाडीवर तर दुकानांची नावे श्री निंबादैत्य या नावाने गावामध्ये आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com