Unseasonal Rain : खामगाव तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्याचा कहर; अवकाळी पावसाने केले पिकांचे मोठे नुकसान

Buldhana News : येत्या दोन- तीन दिवस अवकाळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv

बुलढाणा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. या दरम्यान बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात ९ एप्रिलला सायंकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Rain) झाला. या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर जोरदार पाऊस असल्याने घरात देखील पाणी शिरले आहे. (Latest Marathi News)

Unseasonal Rain
Sanjay Raut: राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली; संजय राऊत यांचा सवाल

येत्या दोन- तीन दिवस अवकाळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामध्ये अमरावती, बीड, बुलढाणा, अकोला (Akola) जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस व गारपीट देखील झाली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. यात (Onion) कांदा, मका, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे (Farmer) शेतकरीवर्ग पुन्हा हवालदिल झाला आहे .

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Krushi Utpanna Bazar Samiti: नाशकातील बाजार समित्यांचे कांदा लिलाव 10 दिवसांपासून ठप्प, 100 कोटींचे नुकसान

घरात शिरले पाणी 

जोरदार वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. यामुळे काही शेतात पाणी साचले आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे शाळेवरील तीन पत्रे सुद्धा उडाली आहेत. घरात पाणी शिरल्याने अन्न धान्य भिजले असून नागरिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा खचला आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेले लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी व प्रशासन यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थ व नागरिक वाऱ्यावर सोडलेले दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com