Buldhana : जमिनीचा योग्य मोबदला द्या अन्यथा...; बुलढाण्यातील ५ गावांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार

Buldhana Constituency : संग्रामपूर तालुक्यातील कुवरदेव, खेललोन, खेल - शिवापूर, खेल-माळी, खेल-वर्गे आणि करमोडा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केल्या जात आहेत.
Buldhana Constituency
BuldhanaSaam TV
Published On

संजय जाधव

Lok Sabha Election :

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला-खंडवा रेल्वे लाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Buldhana Constituency
Buldhana News: नांदुरा मिरवणुकीवरील दगडफेक प्रकरण; १०० जणांविरुद्धात गुन्हा दाखल;१६ आरोपी अटकेत

बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील कुवरदेव, खेललोन, खेल - शिवापूर, खेल-माळी, खेल-वर्गे आणि करमोडा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केल्या जात आहेत.

मात्र या शेतकऱ्यांना मोबदला देत असताना अत्यंत कवडीमोल भावाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे या बाबत पाठपुरावा केलाय. मात्र तरी देखील प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकाच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

या बहिष्कारामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. बुलढाण्यात महायुतीच्या प्रतापराव जाधवांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी निवडणुकीबाबत असा निर्णय घेतल्या पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Buldhana Constituency
Buldhana Loksabha News: महायुतीत बंडखोरी? शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर; आता भाजपच्या माजी आमदारानेही भरला अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com