Buldhana News: नांदुरा मिरवणुकीवरील दगडफेक प्रकरण; १०० जणांविरुद्धात गुन्हा दाखल;१६ आरोपी अटकेत

Buldhana : दगडफेक प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात एकून १०० जणांविरुद्ध कलम ३०८, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, भादंवि सहकलम ०७ क्रि. अमेडमेंट अॅक्ट १९३२ सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करून यामध्ये आतापर्यंत एकूण १६ आरोपींना पोलिसांनी अटक केली
Buldhana Stone Pelting case
Buldhana Stone Pelting caseSaam Tv RNO
Published On

Buldhana Stone Pelting case :

छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवारी २८ मार्च रोजी तिथीप्रमाणे जयंती होती. यानिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नांदुरा शहरात सकाळी मोटारसायकल रॅली आणि सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. (Latest News)

त्यानंतर सायंकाळी अंबादेवी गड देवगड येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मोतीपुरा भागातून जात असताना अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत मोतीपुरा येथील राज संतोष सोनोने हा तरुण जखमी झाला. यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही दगडांचा मार बसला.

ठाणेदार विलास पाटील यांनी आयोजकांची समजूत घालून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. मात्र ही मिरवणूक उस्मानीया चौकातून जात असताना आठवडी बाजाराकडून येणाऱ्या रस्त्याकडून पुन्हा मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यानंतर दुसऱ्या गटानेही दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Buldhana Stone Pelting case
बुलढाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त, 43 जणांना अटक

ठाणेदार विलास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परीस्थिती आटोक्यात आणली. या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात एकून १०० जणांविरुद्ध कलम ३०८, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, भादंवि सहकलम ०७ क्रि. अमेडमेंट अॅक्ट १९३२ सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करून यामध्ये आतापर्यंत एकूण १६ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतरही आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

Buldhana Stone Pelting case
Dharashiv Crime News : मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना अटक, आनंदनगर पोलिसांचा तपास सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com