बुलढाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त, 43 जणांना अटक

Buldhana Crime News : राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शिवारमध्ये दारुबंदी अधिनियमांतर्गत छापा घातला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
illegal liquor of over rs 5 lakh seized by excise department in buldhana
illegal liquor of over rs 5 lakh seized by excise department in buldhanasaam tv

Buldhana :

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुलढाणा जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीवर कारवाई सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत आतापर्यंत 42 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पाेलिसांनी 43 संशयित आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. या कारवाईत 2 वाहनांसह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शिवारमध्ये दारुबंदी अधिनियमांतर्गत छापा घातला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

illegal liquor of over rs 5 lakh seized by excise department in buldhana
नितेश राणेंनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये; बच्चू कडू असं का म्हणाले?

या छाप्यामध्ये 130 लिटर हातभट्टी, मोहा सोडवा 1200 लिटर, प्लास्टिक नळ्या 6 नग, पंधरा लिटर क्षमतेचे पतरी डबे 86 नग, जर्मन चरव्या 6 नग, 20 लिटर क्षमतेचे जार 5 नग, 10 लिटर क्षमतेचे 3 कॅन असा 59 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशिर व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

illegal liquor of over rs 5 lakh seized by excise department in buldhana
Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com