Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

risod krushi utpanna bazar samiti news : वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समिती हळदी खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरांत चढ उतार हाेत हाेते.
risod krushi utpanna bazar samiti will remain closed till 31 march
risod krushi utpanna bazar samiti will remain closed till 31 march saam tv

- मनाेज जयस्वाल

Washim :

वाशिम पाठोपाठ आता रिसोडची कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी नाणेटंचाईचे कारण पुढे करत आजपासून (गुरुवार, ता. 21 मार्च) 31 मार्चपर्यंत बंद (risod krushi utpanna bazar samiti will remain closed till 31 march) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल दहा दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतक-यांची माेठी अडचण हाेणार असल्याची चर्चा बाजार समितीत सुरु आहे.  (Maharashtra News)

वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समिती हळदी खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरांत चढ उतार हाेत हाेते. गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये साठवून ठेवलेली हळद (turmeric) रिसाेड बाजार समितीत येऊ लागली आहे. हळद कांडीला आणि हळद गटूला प्रति क्विंटल चांगला दर मिळू लागल्याने शेतकरी उत्साही हाेते.

risod krushi utpanna bazar samiti will remain closed till 31 march
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! कोकणात कलिंगड शेतीतून मिळविले लाखाेंचे उत्पन्न; वाचा नाईकांची यशाेगाथा

दरम्यान नाणेटंचाईचे कारण पुढे करुन रिसाेड बाजारा समिती 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी आजपासून झाली. आज बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागणार. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

risod krushi utpanna bazar samiti will remain closed till 31 march
Hingoli : कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांच्या मारेक-यांना अटक करा, हिंगाेली जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांचा माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com