CCTV Footage: चिकन झणझणीत बनवलं नाही म्हणून बायकोला बिल्डिंगवरुन फेकलं; धक्कादायक VIDEO आला समोर

Man Throws Wife Video: सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका नवऱ्याने बायकोला खिडकीतून खाली फेकल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचं सांगितल जात आहे.
CCTV Footage
CCTV FootageYandex

Pakistan Crime News Man Throws Wife

सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Crime News) होत आहे. यामध्ये एका नवऱ्याने बायकोला खिडकीतून खाली फेकल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचं सांगितल जात आहे. या महिलेला तिच्या नवऱ्याने खाली फेकण्याचं कारण ऐकून धक्काच बसतो. झणझणीत चिकण बनवलं नाही म्हणून नवऱ्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. (Latest Crime News)

या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या घराच्या छतावरून खाली पडताना दिसत आहे. ही महिला मोठ्याने किंचाळत आहे. ती जोरजोराने ओरडत असल्याचं व्हिडिओमध्ये (Man Throws Wife Out Of Window) दिसतंय. ही महिला अचानक छतावरून खाली पडली आहे. तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेले लोकं तातडीने तिच्या मदतीसाठी पोहोचले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुखापत झाल्यामुळे ही महिला वेदनेने विव्हाळत आहे. काही लोकं तिला मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचतात अन् तिला उचलतात. व्हिडीओ (CCTV Footage) शेअर करणाऱ्या व्यक्तीने दावा केला (Viral) आहे की, या महिलेला मसालेदार चिकन (Chiken) शिजवता येत नव्हतं, त्यामुळे पाकिस्तानी व्यक्ती संतापला. नंतर त्याने तिला उचलून टेरेसवरून खाली फेकलं. या घटनेला साम टीव्ही दुजोरा देत नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @ZafarHeretic नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'चिकनमध्ये नीट मसाले न घालल्यामुळे पाकिस्तानी (Pakistan Crime News) व्यक्तीने पत्नीला खिडकीतून फेकून दिलं. त्यांच्यामध्ये नैतिकता आणि मानवता बिंबवण्यात इस्लाम का अपयशी ठरला आहे?'असा सवालही त्याने कॅप्शनमध्ये विचारला आहे.

CCTV Footage
Crime News: रोहितची विकेट गेल्याने जल्लोष केला; संतापलेल्या चुलत्या पुतण्याच्या मारहाणीत ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

19 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 68 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या (viral video) आहेत. अनेकजण हे भयावह असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिलंय की पाकिस्तानमध्ये (Pakistan) या घटना अतिशय सामान्य आहेत.

CCTV Footage
Nagpur Crime: नागपूर पोलिसांची मोठी कारवाई! चोरीच्या प्रकरणात चौघांना अटक; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com