Mumbai Crime News: मुंबई हादरली! 15 वर्षीय मुलीवर कॅब चालकाकडून अत्याचार

Shocking News: मुंबईतील दादर शहरातमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅब चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai
MumbaiSaam TV

Mumbai Crime News

मुंबईतील दादर शहरातमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅब(Cab) चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणांतील आरोपीला पोलिसांनी अटक केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai
Dhule Crime News : अफूची पुष्पा स्टाईल वाहतूक, दोघांना अटक; शिरपूर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलीचे कुंटुबिय त्याच्या मूळ गावी कामानिमित्त गेल्याने ती त्यांच्या शेजाऱ्याकडे काही दिवस थांबली होती.मात्र (ता.२१) गुरुवारी रात्री साधारण २वाजेच्या सुमारास पीडित मुलगी कोणाला काही न सांगता एकटीच घराबाहेर पडली.

मुलगी ज्या शेजाऱ्यांकडे काही दिवस वास्तव्यास होती ते त्यांचे नातेवाईक असल्याने मुलीच्या आईने तिला त्यांच्याकडे राहण्यास सांगितले होते. मात्र गुरुवारी रात्री मुलगी कोणा काही न सागंता बाहेर पडली असता तिला एकटे पाहून कॅब चालकाने तिला बोलण्याच्या नादात तिला तेथून घेऊन गेला, दादर(Dadar) पोलिसांनी ही माहिती दिली.

मोहम्मद जलील खलील असे आरोपी कॅब चालकाचे नाव आहे. मोहम्मदने तिला बोलण्यात गुडंळले आणि मुंबई दर्शन दाखवून देऊ या बहाण्याने तिला कॅबमध्ये बसवले.त्यानंतर मोहम्मदने काही वेळ तिला कॅबअत्याचार बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीने या घटनेनंतर घरी पोहचल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रार नोंद केल्यानंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच या आरोपीचा मोबाईल़ नंबर ट्रेस करून त्याला पकडण्यास यश आलं आहे आणि त्यांनी आरोपीला वडाळा येथून अटक करण्यात आली.

आरोपी कॅब चालकावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवार रात्री आरोपीने तरुणीला त्याचा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून दिला होता. मोहम्मदला वाटले मुलगी त्याला परत त्याला कॉल करेल. मात्र मोबाईल नंबर मिळाल्याने आरोपीचा तपास लवकर लागण्यात मदत झाली असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai
Lonavala Crime News : अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांवर लाेणावळ्यात गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com