Dhule Crime News : अफूची पुष्पा स्टाईल वाहतूक, दोघांना अटक; शिरपूर पोलिसांची कारवाई

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते.
dhule police charged two along with vehicle transporting illegal activities
dhule police charged two along with vehicle transporting illegal activitiesSaam TV
Published On

Dhule :

शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधीत अफूची वाहतूक रोखत मध्यप्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता. पाेलिसांना संशय येऊ नये यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते. पाेलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वाहन तपासले असता चालक व वाहकाचे मनसुबे उधळले गेले. (Maharashtra News)

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते.

dhule police charged two along with vehicle transporting illegal activities
बुलढाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त, 43 जणांना अटक

पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर माहिती मिळालेले वाहन पोलिसांना आढळून आले. संबंधित वाहन थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख 76 हजार रुपये किंमतीची 72 किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे, व सात लाख रुपये किंमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किंमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण 12 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

dhule police charged two along with vehicle transporting illegal activities
Sant Tukaram Beej 2024 : वर्सोव्यातील चौपाटीवर उभारली आयोध्या मंदिराची लक्षवेधी प्रतिकृती, हरिनाम सप्ताहात भक्त तल्लीन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com