Nagpur Crime: नागपूर पोलिसांची मोठी कारवाई! चोरीच्या प्रकरणात चौघांना अटक; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur Latest News: कारवाईमध्ये दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून 2 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Nagpur Latest News:
Nagpur Latest News: Saamtv
Published On

पराग ढोबळे, नागपूर|ता.

Nagpur Crime News:

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने यशस्वी कारवाई करत चोरीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून 2 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथाळा गावानजीक असलेल्या शर्मा फॅब्रिकेटर इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीत चोरीची घटना घडली होती. यामध्ये वेल्डिंग मशीन, कटर मशीन सह ईतर साहित्य चोरीला गेले होते. मागील काही महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली.

या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक करत घेत त्यांच्याकडून चोरी गेलेला 2 लाख 10 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी राजेश शाहू, सुरज तीवारी, राहूल मेश्राम, अभिजीत चव्हाण या चारही आरोपींना नागपूर ग्रामीणच्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी चोरी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nagpur Latest News:
Eknath Shashthi 2024 : टाळ मृदुंगाचा गजरात शेकडो वारकरी नाथांच्या भेटीला पालख्यांसह पैठणकडे मार्गस्थ

नांदेड पोलिसांनी १४६ मोबाईल केले परत..

नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने चोरीला गेलेले तब्बल 164 मोबाईल हस्तगत केले हाेते. त्यापैकी 70 मोबाईल नागरिकांना पाेलिसांनी नुकतेच परत केले. चाेरीस गेलेला आपला माेबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेह-यावर समाधान हाेते. नागरिकांनी नांदेड पाेलिसांचे आभार मानले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Latest News:
परभणी : 57 फटका सायलेन्सर्सचा राेलरखाली चुराडा, फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com