परभणी : 57 फटका सायलेन्सर्सचा राेलरखाली चुराडा, फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा

Parbhani Police News : फॅन्सी नंबर प्लेट, दुचाकीवर नंबर प्लेट नसणे तसेच इतर प्रकारे मोटार वाहन कायद्याअंतर्गत नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
parbhani police breaks 57 phataka silencer
parbhani police breaks 57 phataka silencersaam tv

Parbhani :

परभणी जिल्ह्यातील पाेलिस दलाने कर्कश आवाज करणारे दुचाकी सायलेंसर जप्त करण्यास प्रारंभ केला. आहे. पाेलिसांनी गंगाखेड शहरातील सुमारे 57 कर्कश आवाजातील सायलेंसर जप्त केले. या सर्व सायलेंसरवर रोडरोलर फिरवून ते निकामी करण्यात आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गंगाखेड शहरात व हद्दीत बुलेट, मोटरसायकलला कंपनीकडून बसविण्यात आलेले सायलेन्सर काढून त्यास सुधारित करून पतियाला सायलेन्सर, फटाका सायलेन्सर व इंदौर सायलेन्सर असे कर्कश आवाजातील सायलेंसर लावण्याचा धडाका सुरु आहे. या वाहनधारकांकडून नागरिकांना त्रास हाेत असल्याची तक्रारी पाेलिसांना प्राप्त झाल्या. (Maharashtra News)

parbhani police breaks 57 phataka silencer
Nanded Police News : शाब्बास नांदेड पोलिस! चाेरीस गेलेले 164 मोबाईल हस्तगत, 70 नागरिकांना केले परत

पाेलिसांनी अशा 57 वाहनधारकांकडून सायलेन्सर जप्त केले. ते सर्व सायलेन्सर गंगाखेड चाैकीत ठेवण्यात आले. त्यानंतर पाेलिसांनी सर्व सायलेन्सर वर रोडरोलर फिरवून ते निकामी केले. फॅन्सी नंबर प्लेट, दुचाकीवर नंबर प्लेट नसणे तसेच इतर प्रकारे मोटार वाहन कायद्याअंतर्गत नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

parbhani police breaks 57 phataka silencer
Nashik Fire News : बोलठाण बस स्थानक परिसरातील दुकान आगीत भस्मसात, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा झाला काेळसा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com