fire broke out in mobile shop near nashik
fire broke out in mobile shop near nashik saam tv

Nashik Fire News : बोलठाण बस स्थानक परिसरातील दुकान आगीत भस्मसात, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा झाला काेळसा

या युवकांनी दुकानाचे संचालक उमेश दायमा आणि त्यांचे बंधू पत्रकार निलेश दायमा यांच्याशी संपर्क साधला. त्यांना दुकानात आग लागल्याची शक्यता वर्तवली.

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील एका मोबाईल शॉपला आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये माेबाईल शाॅपीमधील बहुतांश माल जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनूसार या घटनेत लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : बस स्थानक परिसरात असलेल्या हरिओम मोबाईल शॉपमध्ये पहाटेच्या सुमारास आग लागली. गावातील काही युवक आणि नागरिक मॉर्निंग वॉकसाठी निघाले हाेते. त्यावेळी त्यांना दुकानातून धुर निघत असल्याचे दिसून आले.

fire broke out in mobile shop near nashik
Nanded Police News : शाब्बास नांदेड पोलिस! चाेरीस गेलेले 164 मोबाईल हस्तगत, 70 नागरिकांना केले परत

या युवकांनी दुकानाचे संचालक उमेश दायमा आणि त्यांचे बंधू पत्रकार निलेश दायमा यांच्याशी संपर्क साधला. त्यांना दुकानात आग लागल्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर दायमा बंधू यांनी दुकानचे शटर उघडून नागरिकांच्या सहकार्याने आग विझविली.

fire broke out in mobile shop near nashik
Sharad Pawar News : सातारा लाेकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांची माघार, शरद पवार निवडणुकीच्या मैदानात? (Video)

या घटनेत मोबाईल रिपेअरींगसाठी लागणारे साहित्य, बेसीक फोन ५० नग, जुने मोबाईल, लॅपटॉप, इतर साहित्य, दुकानचे फर्निचर असे सुमारे आठ लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी जयेश मलधोडे यांनी पंचांसमक्ष केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे. या दुकानला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नसून घटनेबाबत बोलठाण तसेच परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

fire broke out in mobile shop near nashik
Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com