Crime News: रोहितची विकेट गेल्याने जल्लोष केला; संतापलेल्या चुलत्या पुतण्याच्या मारहाणीत ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Kolhapur Crime News: कोल्हापूरमध्ये आयपीएल मॅचवरून झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरच्या हनमंतवाडीमध्ये ही घटना घडली आहे.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime NewsSaam Tv
Published On

रणजित माजगांवकर साम टीव्ही, कोल्हापूर

Person Death Dispute Over IPL Match

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आयपीएल मॅचवरून झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरच्या हनमंतवाडीमध्ये ही घटना घडली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आऊट झाल्यानंतर एक व्यक्ती जल्लोष व्यक्त करत होता. या जल्लोष करणाऱ्या व्यक्तीला दांडक्याने जबर मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या क्रिकेट प्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (Latest Crime News)

बंडूपंत तीबिले, असं मृताचं नाव आहे. मारहाण करणाऱ्या बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी मुंबई विरुद्ध चेन्नई दरम्यान झालेल्या सामन्यानंतर ही मारहाणीची घटना (Kolhapur Crime News) घडली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हनमंतवाडी इथं दोन गटात बुधवारी रात्री आयपीएल सामन्यावरून (Cricket) तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळेस बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या चुलत्या-पुतण्याने लाकडी फळी आणि काठीचा वापर करत बंडोपंत बापू तिबीले यांना गंभीर मारहाण (Crime News) केली होती. या मारहाणीमध्ये मृतक जखमी केले होते. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झालाय.

टीव्हीवर आयपीएल (IPL) क्रिकेटचा सामना बघत असताना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले आणि बळवंत झांजगे यांच्या चेष्टा मस्करी सुरू झाली होती. त्याचं रूपांतर बाहेर आल्यानंतर मोठ्या भांडणात (Dispute Over IPL Match) झालं. बळवंत झांजगे आणि त्यांचा पुतण्या सागर झांजगे यांच्यत मारहाणीत तिबिले गंभीर जखमी झाले होते.

Kolhapur Crime News
Pune Crime News : कोयत्याने वार, २ तरुण रक्तबंबाळ! तरुणीसाठी पुण्यात भरदिवसा थरारक घटना

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच तिबिले यांचा मृत्यू झाला आहे. करवीर पोलिसांनी संशयित सागर झांजगे आणि बळवंत झांजगे यांना ताब्यात घेतलं (Person Death Dispute Over IPL Match) आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Kolhapur Crime News
Mumbai Crime: छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग... महिला शिक्षिकेवर रॉडने प्राणघातक हल्ला; कुरारमधील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com