सुन आवडत नसल्यामुळे ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूरमध्ये (Badlapur) स्वत:च्या आईने मुलावर मिरची पावडर मिसळलेले उकळते पाणी ओतल्याची घटना घडली आहे. आईने मुलाला पत्नीला सोडून देण्यास अनेकदा सांगितलं होतं. परंतु मुलगा बायकोला सोडायला तयार नव्हता. त्यामुळे संतापलेल्या आईने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. (Latest Marathi News)
उल्हासनगरमधील बदलापूर परिसरात ही घटना घडली. येथे साई वालावली गावात मोहन नावाचा व्यक्ती त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याच्यासोबत त्याची आई आणि पत्नीही घरात एकत्र राहतात. (Thane Crime) मोहनच्या आईला तिची सून आवडत नसल्याचं सांगितलं जात आहे. घरात सूनबाई आल्यानंतर सारखी भांडणं होत असल्याचं मोहनच्या आईला वाटता. त्यांच्या घरात जमिनीवरून वाद देखील सुरू आहे. या सगळ्यासाठी मोहनची आई तिच्या सुनेला जबाबदार धरत आहे. तिच्या मनात सुनेबद्दल रागाची भावना आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तिने अनेकदा मोहनला पत्नीला सोडण्यास सांगितलं. मात्र, मोहनने तिला सोडण्यास स्पष्ट नकार दिलाय. शुक्रवारी मोहनची पत्नी काही कामानिमित्त बाजारात गेली होती. तेव्हा आईने मोहनला मी तुला जेवू घालते. जेवायला बस, असं सांगितलं. मोहन जेवायला बसल्यानंतर आईने पुन्हा त्याला पत्नीला सोडायला सांगितले. यावरून त्यांच्यात वाद (Crime News) झाला.
रागाच्या भरात मोहनच्या आईने एका भांड्यात उकळतं पाणी आणलं. तिने या पाण्यात भरपूर मिरची पावडर मिसळली होती. तिने ते पाणी तिचा मुलगा मोहनवर ओतलं. गरम पाण्यामुळे मोहनचे शरीर (Mother Poured Boiling Water On Son) भाजलं. वेदनेमुळे मोहन मोठमोठ्याने ओरडू लागला. मोहनचा आवाज ऐकून शेजारी धावत त्याच्या घरी आले. सर्वांनी मिळून मोहनला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. तेथे मोहनवर उपचार सुरू आहेत.
जेव्हा मोहनच्या आईने त्याच्यावर गरम पाणी ओतले, तेव्हा ती प्रचंड रागात होती. तेव्हा ती मोहनला 'तुझ्या बायकोने सगळं काही उद्ध्वस्त केलंय, तिला सोडून दे', असं म्हणत ( Dispute With Daughter In Law) होती. या घटनेनंतर मोहनच्या पत्नीला तिच्या सासूविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवायचा होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं सांगितलं आहे. शेजाऱ्यांनीही मोहनच्या आईला अटक करण्याची मागणी केलीय. ती बिनधास्तपणे परिसरात फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.