Viral Video: चहाच्या दुकानात तरूणांची तुंबळ हाणामारी; तोडफोडीचा Video व्हायरल, भांडणाचं विचित्र कारण आलं समोर

Youth Fight Video: चहाच्या दुकानात ९ रुपयांसाठी तरूणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Youth Fight Video
Youth Fight VideoSaam Tv
Published On

Latest Viral News

बहुतेक लोकांना चहा आवडतो. चहा (Tea) पिल्यामुळं टेन्शन दूर होतं, असं म्हणतात. पण हरियाणातील गुरुग्राममध्ये चहानेच टेन्शन वाढवलं आहे. चहाच्या पैशांवरून ग्राहकांची दूकानमालकासोबत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दुकानात चहा प्यायल्यानंतर काही तरुणांनी हल्ला करून दुकानात तोडफोड केली.  (Latest Marathi News)

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. हे भांडण चहाच्या पैशावरून सुरू झाल्याचं बोललं जातंय. गुरुग्राममध्ये अवघ्या 9 रुपयांसाठी तोडफोड आणि हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडिओ ( Fight Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना 2 मार्च रोजी घडल्याची माहिती मिळतेय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चहाच्या बिलावरून तुंबळ हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्चच्या रात्री काही लोक गुरुग्राममधील एका चहाच्या दुकानात गेले होते. यानंतर पैसे भरण्याची वेळ आल्यानंतर तेथे एकच गोंधळ उडाला. 15 रुपये किमतीच्या 3 चहाचं बिल 45 रुपये ( Fight Over Tea Bill) आलं. मात्र, त्यांना बिल भरण्यास सांगितलं असता त्यांनी चहा 15 रुपयांचा नसून 12 रुपयांचा असल्याचं सांगितलं. त्यानुसार बिल 36 रुपये येतं. 9 रुपयांसाठी त्यांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली.

दुकानातील कर्मचाऱ्यानी या तरूणांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. तरुणांनी दुकानात ठेवलेल्या खुर्च्या फोडल्या आणि जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. तरुणांनी चहाच्या दुकानाची तोडफोड कशी (Youth Fight Video) केली, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. तरुणांनी दुकानात ठेवलेल्या खुर्च्याही फोडल्या. तसेच खुर्ची उचलून दुकानदारावर फेकल्याचं दिसत आहे.

Youth Fight Video
Viral Video: नगरची 'सुपर डान्सर'; विद्यार्थिनीच्या लईच भारी डान्सला प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद, पाहा VIDEO

सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

याप्रकरणी पालम विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली (Viral News) आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने तोडफोडीच्या व्हिडिओची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली आहे.

या अज्ञात हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं (Viral Video On Social Media) आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Youth Fight Video
Viral Video : बॉयफ्रेंडसोबत तरुणी दुचाकीवर उलट दिशेने बसल्या...; गोव्यातला VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com