Viral Video : बॉयफ्रेंडसोबत तरुणी दुचाकीवर उलट दिशेने बसल्या...; गोव्यातला VIDEO व्हायरल

Goa News : अनेक राज्यांतून तरुण तरुणी येथे फिरण्यासाठी येत असतात. अशात सोशल मीडियावर दोन पर्यटक तरुणींचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On

Viral Video :

आयुष्यात एकदा तरी गोव्याला फिरण्यासाठी जावं असं स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. गेव्याला असलेला समुद्र किनारपट्टी यामुळे येथील सर्वच बीच पर्यटकांसाठी मोठं आकर्षण आहेत. अनेक राज्यांतून तरुण तरुणी येथे फिरण्यासाठी येत असतात. अशात सोशल मीडियावर दोन पर्यटक तरुणींचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.

Viral Video
Santosh Banger: ...अन्यथा माझ्या इतका वाईट माणूस कुणीच नाही; आमदार संतोष बांगर अधिकाऱ्यावर भडकले, पाहा VIDEO

गोव्यामध्ये आल्यावर येथील निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी काही तरुण तरुणी येथे गोंधळ घालतात आणि हुल्लडबाजी करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन जोडपे गोव्यातील प्रसिद्ध पर्रा रोडवर फिरण्यासाठी आले आहेत. रस्ताच्या दोन्ही बाजूंना नारळाची झाडे असल्याने या रस्त्यावरून फिरल्यावर देखील फार छान वाटते. आता या दोन्ही कपल्समधील मुलं दुचाकी चालवत आहेत. तर दोन्ही तरुणी दुचाकीवर विरुद्ध दिशेने बसले आहेत.

दुचाकीच्या विरुद्ध दिशेने बसून त्यांचे स्वत:चेही फोटोशूट करण्याचे काम सुरू आहे. या तरुणींचा व्हिडीओ @HermanGomes_journo या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. "गोव्याला भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांना विनंती आहे, कृपया राज्यात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे वाईट वर्तन बाहेर सोडून या. सामान्य माणसं वागतात तसे वागा. उत्तर गोव्यात नेहमीच असं चित्र पाहायला मिळतं, असं व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

गोव्यातील प्रसिद्ध पर्रा रोडवर दररोज अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. येथे फिरत असताना भारतीय संस्कृतीसह अन्य सर्व गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे. मात्र अनेकजण येथे मजा मस्ती करताना आपण काय वागतोय काय करतोय याचं भान ठेवत नाहीत. चुकीच्या वर्तणामुळे अन्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लगतो.

Viral Video
Crime News: खळबळजनक! महिनाभर बेपत्ता, खाडीत सापडला 12 वर्षाच्या मुलाचा शीर नसलेला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com