Zero Oil Food Video : झिरो ऑईल कुकिंग आलू-मटर; वजन कमी करण्यासाठी भन्नाट रेसिपी व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर कुकींगचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातीलच एक झिरो ऑईलचा वापर करून आलू मटर कसे बनवायचे याचाही व्हिडिओ समोर आला आहे.
Zero Oil Food Video
Zero Oil Food VideoSaam TV
Published On

Zero Oil Food Viral Video :

आलू आणि मटरची चमचमीत भाजी सर्वांनाच आवडते. ही भाजी बनवताना शक्यतो तेलाचा जास्त वापर केला जातो. आहारात तेल जास्त असल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. तसेच लठ्ठपणा आणखी वाढतो. आता तुम्हाला देखील तुमचं वजन आणि लठ्ठपणा कमी करायचा असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Zero Oil Food Video
Viral Video: तरूण-तरुणींनी गायला बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा सांगणारा पोवाडा, काळजाचा ठाव घेणारा VIDEO पाहा!

पूर्वी जेवण बनवण्यासाठी रेसिपीच्या पुस्तकांची मदत प्रत्येक मुलीला लागत होती. मात्र आता सोशल मीडियामुळे सर्व मुली ऑनलाईन रेसिपी पाहून जेवण बनवतात. त्यामध्ये किती प्रमाणात मीठ मसाला टाकावे हे सर्व समजते. सोशल मीडियावर कुकींगचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातीलच एक झिरो ऑईलचा वापर करून आलू मटर कसे बनवायचे याचाही व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यासाठी भाजी बनवताना एका कढईमध्ये तेल न टाकता थेट जीर टाकलं आहे. जिरे चांगले भाजल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. त्याला थोडं पाणी सुटेल हे पाणी सुकले की त्यात एक चमचा पाणी टाकून पुन्हा कांदा चांगला भाजून घ्या. त्यानंतर तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये टाका. मीठ, मसाला, हळद, धने पूड या सर्व गोष्टी यामध्ये टाकून छान भाजून घ्या.

हे मिश्रण भाजून झाल्यावर यात पुन्हा थोडं पाणी टाका. नंतर टोमॅटोचे बारीक काप यामध्ये टाकून घ्या. पुढे हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून आणखी पाणी टाकून शिजवून घ्या. त्यानंतर यात मटर आणि बटाटा टाकून घ्या. थोडे थोडे पाणी टाकून सर्व काही शिजवून घ्या. त्यात झाली तुमची ऑईल फ्री आलू मटर भाजी. वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारच्या भाज्या झाल्यास फायदेशीर ठरेल.

सोशल मीडियावर @dishcovery या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी ऑईल फ्री पुरीची रेसिपी व्हायरल झाली होती. सध्या अनेक व्यक्तींना विविध आजार जडले आहेत. त्यामुळे घरात पथ्य पळून जेवण बनवणे अनेक गृहिणींनी कठीण जाते. त्यामुळे अशा रेसिपी ट्राय केल्यास त्या सर्वांना आवडतात आणि आरोग्यासाठी देखील पौष्टिक असतात.

Zero Oil Food Video
Sindhudurg Crime News : लग्नाच्या दुस-याच दिवशी कुडाळमधून नवरीने ठाेकली धूम; नगर, श्रीरामपूर, पंढरपूरसह साता-यात पाेलिसांची कारवाई, 7 अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com