Dharashiv Crime News : मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना अटक, आनंदनगर पोलिसांचा तपास सुरु

तलाठ्यांना कारवाई न करण्याबाबत सांगण्यासाठी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितल्याने आणि पैसे घेतल्याने मंडलाधिकारी याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असे एसीबीने नमूद केले.
lcb arrests revenue circle officer for accepting bribe in dharashiv
lcb arrests revenue circle officer for accepting bribe in dharashivsaam tv

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

धाराशिव जिल्ह्यात ४ हजार रुपयांची लाच घेताना मंडलाधिकारी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. देवानंद कांबळे असे अटक केलेल्या मंडलाधिकारी याचे नाव आहे. आनंदनगर पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील देवस्थान जमीनीतुन ५० ब्रास मुरूम रॉयल्टी न भरुन घेता वाहतुक करण्याची परवानगी देण्यासाठी आणि तलाठ्यांना कारवाई न करण्यासाठी देवानंद कांबळे याने तक्रारदारला लाच मागितीली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.

lcb arrests revenue circle officer for accepting bribe in dharashiv
Wai Bagad Yatra : काळूबाईच्या नावानं चांगभलं, काशीनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात वाईत बगाड यात्रा उत्साहात (Video)

एसीबीने सापळा रचला असता त्यामध्ये देवानंद कांबळे अलगद सापडला. त्याला एसीबीने चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Maharashtra News)

तलाठ्यांना कारवाई न करण्याबाबत सांगण्यासाठी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितल्याने आणि पैसे घेतल्याने मंडलाधिकारी याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असे एसीबीने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

lcb arrests revenue circle officer for accepting bribe in dharashiv
उद्धव ठाकरेंनी देऊ केलेली उमेदवारी नाकारली, चेतन नरकेंचा कोल्हापुरातून लढण्याचा निर्धार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com